मुग्धा अन् प्रथमेश दर गुरुवारी करतात भजन सेवा, चाहत्यांकडून संस्कारांचं तोंडभरून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 10:44 IST2024-08-04T10:43:33+5:302024-08-04T10:44:08+5:30

नुकतंच मुग्धाने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

mugdha vaishampayan performing bhajan with husband prathamesh laghate | मुग्धा अन् प्रथमेश दर गुरुवारी करतात भजन सेवा, चाहत्यांकडून संस्कारांचं तोंडभरून कौतुक

मुग्धा अन् प्रथमेश दर गुरुवारी करतात भजन सेवा, चाहत्यांकडून संस्कारांचं तोंडभरून कौतुक

आपल्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी लोकप्रिय जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan)  व प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) . ही सध्या मराठी संगीत विश्वातील लाडकी जोडी झाली आहे. लग्न झाल्यापासून मुग्धा व प्रथमेश नेहमी चर्चेत असतात. दोघंही आपल्या मराठी संस्कृतीला जपतात आणि हे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन अनेकदा जाणवतं. याची प्रचिती चाहत्यांना पुन्हा एकदा आली आहे. 

नुकतंच मुग्धाने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये  प्रथमेश भजन गाताना दिसून येत आहेत.  प्रथमेश आणि मुग्धा हे दोघेही दर गुरुवारी न चुकता भजन सेवा करतात. मुग्धाने शेअर केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहलं, "मधुर मिलनी आज लाभला सुगंध सोन्याला लावणी भुलली अभंगाला. नित्य गुरुवार भजन सेवा.. अजून काय हवं?". 


या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. चाहत्यांकडून त्यांच्या संस्कारांचं कौतुक करण्यात येतंय. 'तुम्ही आहात माझ्या सारखे तरुणांचे खरे आदर्श, राम कृष्ण हरी', अशी कमेंट एकाने केली.  मुग्धा व प्रथमेशने २१ डिसेंबर २०२३लालग्नगाठ बांधली होती. मुग्धा अलिबागची असून प्रथमेश रत्नागिरीचा आहे. दोघंही उत्तम गायक तर आहेतच पण खूप सरळ आहेत. कुठलाही बडेजाव न दाखवता आपलं साधं, सुंदर आयुष्य चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यांचा हा स्वभाव चाहत्यांच्याही खूप पसंतीस पडतो.

Web Title: mugdha vaishampayan performing bhajan with husband prathamesh laghate