मराठमोळी अभिनेत्री यंदा परदेशात साजरा करतेय गणेशोत्सव, शेअर केला सजावटीचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 10:19 AM2023-09-19T10:19:44+5:302023-09-19T10:20:24+5:30

मराठमोळी अभिनेत्री सध्या न्यूझिलंडमध्ये वास्तव्यास असून ती यंदा तिथेच गणेशोत्सव साजरा करणार आहे.

Marathmoli actress is celebrating Ganeshotsav abroad this year, shared a photo of the decorations | मराठमोळी अभिनेत्री यंदा परदेशात साजरा करतेय गणेशोत्सव, शेअर केला सजावटीचा फोटो

मराठमोळी अभिनेत्री यंदा परदेशात साजरा करतेय गणेशोत्सव, शेअर केला सजावटीचा फोटो

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका अग्गंबाई सूनबाईमधून अभिनेत्री उमा पेंढारकर (Uma Pendharkar) घराघरात पोहचली. तिला या मालिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली. सध्या ती कलाविश्वात सक्रीय नाही, असे असले तरी ती तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावर अपडेट देत असते. दरम्यान उमा पेंढारकर सध्या न्यूझिलंडमध्ये वास्तव्यास आहे. यंदाचा गणेशोत्सवही ती तिथेच साजरा करणार आहे. दरम्यान तिने सोशल मीडियावर बाप्पाच्या आगमनाच्या तयारीचा फोटो शेअर केला आहे.

यंदा अभिनेत्री उमा पेंढारकरच्या न्यूझिलंडमधील घरात बाप्पा विराजमान होणार आहे. त्याच्या तयारीचा फोटो शेअर करत तिने चाहत्यांना माहिती दिली आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, तयारी बाप्पांच्या आगमनाची. यंदा थीम म्हणून वारली पेंटींग करायचं ठरवलं. सलग २ दिवस जागून अखेर आज पूर्ण झालेली ही सजावट. यात तिच्या हातात एक पेटिंग पाहायला मिळत आहे. ज्यावर वारली चित्र पाहायला मिळत आहे. तसेच तिच्या मागे फुले आणि लाइटिंगची सजावट असलेला मकरही पाहायला मिळतो आहे. तिच्या या चित्राचे चाहते खूप कौतुक करत आहेत. 

उमा पेंढारकर हिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने स्वामिनी, अगंबाई सूनबाई, योग योगेश्वर जयशंकर या मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती टेलिव्हिजन विश्वापासून दूर जाऊन काही दिवसांसाठी न्यूझीलंडला राहायला गेली आहे. तिचा पती तिथे स्थायिक असतो. तिथे तिने मानसिक स्वास्थ्यासाठी मोफत समुपदेशन करायला सुरुवात केली आहे. तसेच तिचे स्वतःचे यूट्यूब चॅनेल आहे. त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ती मेकअप, स्कीनकेअर आणि मानसिक स्वास्थ्य यांबद्दल विविध टिप्स देत असते.

Web Title: Marathmoli actress is celebrating Ganeshotsav abroad this year, shared a photo of the decorations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.