"आभाळाएवढं व्यक्तिमत्व आणि अभिनयाचे जादूगार...", अशोक सराफ यांना भेटून भारावला मराठी अभिनेता, शेअर केली पोस्ट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 10:31 IST2025-03-21T10:29:24+5:302025-03-21T10:31:30+5:30

नुकताच 'येड लागलं प्रेमाचं' फेम अभिनेत्याने अशोक सराफ यांच्यासोबतच्या भेटीचा किस्सा मीडियाद्वारे शेअर केला आहे. 

marathi television actor yed lagla premach fame amar jadhav share post after meeting with ashok saraf  | "आभाळाएवढं व्यक्तिमत्व आणि अभिनयाचे जादूगार...", अशोक सराफ यांना भेटून भारावला मराठी अभिनेता, शेअर केली पोस्ट  

"आभाळाएवढं व्यक्तिमत्व आणि अभिनयाचे जादूगार...", अशोक सराफ यांना भेटून भारावला मराठी अभिनेता, शेअर केली पोस्ट  

Amar Jadhav Post: छोट्या पडद्यावरील मालिकांचा प्रेक्षकवर्ग हा फार मोठा आहे. या मालिकांप्रमाणे त्यातील कलाकारही प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागतात. विशेष म्हणजे या यादीत स्टार प्रवाहवरील मालिकांची नावे अग्रक्रमाने घ्यावी लागतील. अलिकडेच मोठ्या जल्लोषात 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार' सोहळा-२०२५ पार पडला. यंदा या सोहळ्याचं पाचवं वर्ष होतं. अनेक दिग्गज कलाकारांनी या सोहळ्यात आपली उपस्थिती लावली. या सोहळ्यात मराठी अभिनेते, निर्माते महेश कोठारे यांच्या हस्ते अशोक सराफ यांचा सन्मान करण्यात आला. यानिमित्ताने अनेक नवोदित कलाकारांना अशोक सराफ (Ashok Saraf) यांना भेटण्याचा योग जुळून आला. नुकताच या भेटीचा किस्सा 'येड लागलं प्रेमाचं' (Yed Lagla Premach) फेम अभिनेत्याने सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. 


अभिनेता विशाल निकम आणि पूजा बिरारी यांची मुख्य भूमिका असलेली येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या लोकप्रियता वाढताना दिसत आहे. या मालिकेत मंजिरी आणि रायाची अनुरुप जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. दरम्यान, मालिकेत मंजिरीची बहिण ऋजूताच्या पतीची भूमिका अभिनेता अमर जाधवने साकारली आहे. नुकतीच अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अशोक सराफ यांच्यासोबतच्या भेटीचा किस्सा शेअर केला आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने म्हटलंय, "आभाळाएवढं व्यक्तिमत्व आणि अभिनयाचे जादूगार असलेल्या, महाराष्ट्राच्या लाडक्या सुपरस्टार अशोक सराफ सरांच्या छायेत बसायला सुद्धा सौभाग्य लागतं...", त्यासाठी स्टार प्रवाहचे मनापासून आभार...! अशा आशयाची पोस्ट अभिनेत्याने लिहिली आहे. 

दरम्यान, अभिनेता अमर जाधवच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने 'प्रेमाची गोष्ट', 'तुझ्या रुपाचं चांदण' तसंच 'अप्पी आमची कलेक्टर' या लोकप्रिय असलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. 

Web Title: marathi television actor yed lagla premach fame amar jadhav share post after meeting with ashok saraf 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.