'आजची मॅच जिंकू दे रे...' World Cup फायनलपूर्वी प्राजक्ता माळीने गणरायाला घातलं साकडं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 13:05 IST2023-11-19T12:50:00+5:302023-11-19T13:05:20+5:30
आज वर्ल्ड कप फायनलकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष लागलेलं आहे.

'आजची मॅच जिंकू दे रे...' World Cup फायनलपूर्वी प्राजक्ता माळीने गणरायाला घातलं साकडं
Ind Vs Aus Final: आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनलचा सामना रंगणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत टीम इंडियाने सर्वच सामने जिंकत फायनलपर्यंत धडक दिली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ भिडणार आहेत. त्यामुळे साहजिकच सर्वच क्रिकेट रसिकांसोबत संपूर्ण देशवासियांची धाकधुक वाढली आहे. दरम्यान मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) सकाळीच गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन त्याच्याकडे साकडंच घातलं आहे.
आज वर्ल्ड कप फायनलकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष लागलेलं आहे. मॅच जिंकू दे म्हणत जो तो प्रार्थना करताना दिसतोय. अभिनेत्री प्राजक्ता माळीने थेऊरच्या श्री चिंतामणी गणपतीचं दर्शन घेतल्याचा फोटो शेअर केला आहे. 'आजची मॅच जिंकू दे रे देवा' असं कॅप्शन देत तिने गणरायाला साकडंच घातलं आहे. ऑफ व्हाईट रंगाची साडी, हिरवा ब्लाऊज, प्राजक्तराजचे दागिने अशा अगदी पारंपारिक लुकमध्ये तिने फोटो पोस्ट केलेत. तर मागे थेऊरच्या चिंतामणीची सुंदर मूर्ती आहे. गाभाऱ्यासमोरुनच तिने हे फोटो कॅमेऱ्यात कैद केले आहेत.
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. मनोरंजनविश्वाशिवाय आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक विषयांवरही ती मत मांडत असते. आज वर्ल्ड कप फायनलपूर्वी तिने केलेली ही पोस्टही चाहत्यांना आवडली आहे. 'सकाळी सकाळी देव देवीचे दर्शन' अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.
दुसरीकडे मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनेही वर्ल्ड कप फायनलवर भाष्य करताना टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या होत्या. 'त्या ऑस्ट्रेलियाची अशी चेचा ना…२००३ चा बदला आपण काही केल्या घेतला पाहिजे' अशी त्याने प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे सध्या सगळीकडेच वर्ल्ड कप फीवर आहे. भारतीय संघच जिंकणार असा विश्वास प्रत्येक जण व्यक्त करताना दिसतोय.