अपघातानंतर मराठी अभिनेत्रीने पुन्हा घेतली नवी कार; किंमत आहे खूप जास्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 17:26 IST2023-06-26T17:25:11+5:302023-06-26T17:26:20+5:30
Meera joshi: काही दिवसांपूर्वीच मीराच्या कारचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठा अपघात झाला होता.

अपघातानंतर मराठी अभिनेत्रीने पुन्हा घेतली नवी कार; किंमत आहे खूप जास्त
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मीरा जोशी (meera joshi) हिचा काही दिवसांपूर्वीच गंभीर अपघात झाला होता. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तिचा कार अपघात झाला. याविषयी तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. या अपघातामध्ये मीराच्या कारचं मोठं नुकसान झालं होतं. विशेष म्हणजे या अपघातानंतर काही दिवसांमध्येच मीराने एक नवीन कोरी गाडी खरेदी केली आहे.
मीराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने नवी कार खरेदी केल्याचं सांगितलं आहे. अलिकडेच मीराने एक नवीन गाडी खरेदी केली असून तिचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मीरा आणि तिचे कुटुंबीय गाडीची पूजा करताना दिसत आहेत. "आमच्या घरातील नवीन सदस्य", असं कॅप्शन देत मीराने या गाडीचा व्हिडीओ शेअर केला आहे.
दरम्यान, मीराने मारुती सुझुकी कंपनीची सेलेरियो ही कार खरेदी केली आहे. तिची ही गाडी पाहिल्यानंतर अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या गाडीची किंमत ५ ते ८ लाखांच्या आसपास असल्याचं सांगण्यात येतं. मीराच्या कारचा अपघात झाल्यानंतर मीराने एक पोस्ट शेअर केली होती. यावेळी“प्रिय सखी, किती आणि कुठे-कुठे भटकलो ना आपण… रात्रं-दिवस, ऊन-वारा, पाऊस, चढ-उतार काहीही असो आपण एकमेकींची काळजी घेतली. पण आज इतका भीषण अपघात होऊनही तू स्वतःला संपवणं पत्करलंस आणि मला किरकोळ ओरखडाही येऊ दिला नाही”, असं म्हणत मीराने या पोस्टला ‘क्रॅश्ड अँड मिसिंग’ असं कॅप्शन दिलं. सोबतच तिच्या अपघात झालेल्या गाडीचे काही फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केला होता.