'बिग बॉस' फेम अभिनेत्रीची महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या नव्या सीझनमध्ये एन्ट्री, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 16:44 IST2024-12-12T16:43:19+5:302024-12-12T16:44:01+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम आता एक ब्रँडच झाला आहे. यातील प्रत्येक कलाकार स्टार आहे. अशा लोकप्रिय कार्यक्रमात बिग बॉस फेम अभिनेत्रीची एन्ट्री झाल्याने तिचं नशीबच फळफळलं आहे.

'बिग बॉस' फेम अभिनेत्रीची महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या नव्या सीझनमध्ये एन्ट्री, म्हणाली...
महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) हा विनोदी कार्यक्रम काही काळाच्या ब्रेकनंतर पुन्हा सुरु झाला आहे. या नव्या सीजनमध्येही तीच धमाल, विनोदी स्किट्स पाहायला मिळणार आहे. सर्व कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी परतले आहेत. दरम्यान या नव्या सीजनमध्ये एक गोष्ट वेगळी आहे ती म्हणजे 'बिग बॉस मराठी सीझन ४' मधील एका अभिनेत्रीने हास्यजत्रेत एन्ट्री केली आहे. कोण आहे ती?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम आता एक ब्रँडच झाला आहे. यातील प्रत्येक कलाकार स्टार आहे. अशा लोकप्रिय कार्यक्रमात बिग बॉस फेम अभिनेत्रीची एन्ट्री झाल्याने तिचं नशीबच फळफळलं आहे. ती अभिनेत्री आहे अमृता देशमुख (Amruta Deshmukh). बिग बॉस मराठी ४ मध्ये अमृता दिसली होती. तिला 'पुण्याची टॉकरवडी' असं नाव पडलं होतं ती आता हास्यजत्रेत येऊन सर्वांना हसवण्यासाठी सज्ज झाली आहे.
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत अमृता म्हणाली, "खरंय, हास्यजत्रा घराघरात सुरु असते. मी त्याचा एक भाग होणार असल्याने खूप आतुर आहे. कलाकार म्हणून एक्स्प्लोर करणं आवश्यक असतं आणि ती संधी मला मिळाली आहे. माझं पहिलंच स्किट रसिका वेंगुर्लेकर आहे. फ्रेशर्स मालिकेनंतर थेट आता मी तिच्यासोबत काम करत आहे. तसंच प्रसाद खांडेकर, निखिल बने, मंदार आणि समीर दादा आहेत. सध्या रिहर्सल सुरु आहे, काय वेगळं करता येईल तसंच कसं ते खुलवता येईल याचा सराव सुरु आहे. त्यामुळे हास्यजत्रा बघा आणि माझा परफॉर्मन्स कसा वाटला हे मला नक्की सांगा."
अमृता देशमुखने गेल्या वर्षी अभिनेता प्रसाद जवादेसोबत लग्नगाठ बांधली. प्रसाद आणि ती दोघंही बिग बॉसमध्ये एकत्र होते. विशेष म्हणजे प्रसादनेही याआधी महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये येऊन परफॉर्म केलं आहे.