ऐश्वर्या नारकरांनी घरातील जुन्या वस्तूंना दिलाय युनिक टच; पाहा त्यांच्या ड्रीमहोमची झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 02:47 PM2023-11-07T14:47:04+5:302023-11-07T14:48:57+5:30

Aishwarya narkar: ऐश्वर्या नारकर यांना झाडांची विशेष आवड आहे. त्यामुळे त्यांच्या घरात जवळपास 80 झाडांची रोपटी आहेत.

marathi actress Aishwarya and Avinash narkar dream home | ऐश्वर्या नारकरांनी घरातील जुन्या वस्तूंना दिलाय युनिक टच; पाहा त्यांच्या ड्रीमहोमची झलक

ऐश्वर्या नारकरांनी घरातील जुन्या वस्तूंना दिलाय युनिक टच; पाहा त्यांच्या ड्रीमहोमची झलक

मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर (aishwarya narkar) . वय हा फक्त आकडा आहे हे ऐश्वर्या यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येतं. वयाची पन्नाशी पार केल्यानंतरही त्यांनी कमालीचा त्यांचा फिटनेस जपला आहे. इतकंच नाही तर सोशल मीडियावरही त्या तितक्याच सक्रीय असतात. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये त्यांची कायम चर्चा रंगते. परंतु, यावेळी त्या त्यांच्या घरामुळे चर्चेत आल्या आहेत.

ऐश्वर्या नारकर यांनी अत्यंत सुंदररित्या त्यांचं घर सजवलं आहे. त्यांच्या या घरात पारंपरिक आणि पाश्चात्य अशा दोन्ही पद्धतीच्या वस्तू पाहायला मिळतात. इतकंच नाही तर घरातील प्रत्येक कोपरा त्यांनी विचारपूर्वक सजवला आहे.

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर आजही एकत्र कुटुंबसोबत राहतात. हे घर प्रचंड मोठं आणि प्रशस्त आहे. सोबतच त्यांना झाडांची आवड असल्यामुळे या घरात जवळपास ८० च्या आसपास झाडांची रोपटी आहेत. यात काही ठिकाणी त्यांनी जुन्या भांड्यांचा वापर कुंडी म्हणून केला आहे.

दरम्यान, त्यांच्या घरात खासकरुन लाकडी फर्निचरचा जास्त वापर केल्याचं दिसून येतं. तसंच घरात मोकळी जागा रहावी या पद्धतीने त्यांनी सामानाची मांडणी केली आहे. या घरात अँटीक शोकेस, झोपाळा आणि कपाटदेखील आहे. विशेष म्हणजे पुरस्कारांच्या ट्रॉफी ठेवण्यासाठी एक स्वतंत्र कपाट सुद्धा त्यांनी केलं आहे. त्यामुळे ऐश्वर्या आणि अविनाश (avinash narkar) यांचं हे ड्रीम होम सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे.

Web Title: marathi actress Aishwarya and Avinash narkar dream home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.