'देवयानी' नंतर संग्रामचंही स्टार प्रवाहवर कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार खलनायकाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 12:34 IST2024-07-23T12:33:43+5:302024-07-23T12:34:35+5:30

शिवानी सुर्वेनंतर आता संग्रामचंही मालिकाविश्वात कमबॅक

marathi actor Sangram Salvi comeback on Star Pravah after Shivani Surve s comeback | 'देवयानी' नंतर संग्रामचंही स्टार प्रवाहवर कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार खलनायकाची भूमिका

'देवयानी' नंतर संग्रामचंही स्टार प्रवाहवर कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार खलनायकाची भूमिका

'देवयानी' या गाजलेल्या मराठी मालिकेतून अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Surve) आणि अभिनेता संग्राम साळवीची (Sangram Salvi) जोडी लोकप्रिय झाली. नुकतंच शिवानीने पु्न्हा मालिकाविश्वात कमबॅक केले. स्टार प्रवाहवरील 'थोडं तुझं थोडं माझं' मालिकेत ती मुख्य भूमिकेत आहे. तिच्या पाठोपाठ संग्राम साळवीच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. संग्रामही स्टार प्रवाहवरील एका मालिकेत झळकणार आहे. 

संग्राम साळवी स्टार प्रवाहवरील 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत संग्राम साळवीची एन्ट्री होणार आहे. ६ वर्ष झाली तो मालिकाविश्वातून गायब होता. आता त्याच्या पुनरागमनाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतील संग्रामच्या एन्ट्रीचा प्रोमोही समोर आला आहे. यामध्ये तो खलनायक साकारणार असल्याचा अंदाज आहे. डोळ्यात आग, भारदस्त आवाज अशा लूकमध्ये तो समोर आला आहे. 

आपल्या कमबॅक विषयी संग्राम म्हणाला, "स्टार प्रवाह हे एक कुटुंब आहे आणि मी त्याचा जुना सदस्य आहे. या कुटुंबासोबत पु्न्हा काम करण्याची संधी मिळाल्याने मला आनंद झाला आहे. देवयानी मालिकेने मला खूप प्रेम दिलं, ओळख दिली. आजही माझा 'तुमच्यासाठी कायपण' हा डायलॉग गाजतो. या पात्रावर प्रेक्षकांनी केलेलं प्रेम पाहून मी भारावलो आहे. येड लागलं प्रेमाचं मध्ये माझी हटके भूमिका असणार आहे. खलनायक साकारत असताना अभिनयाचा कस लागतो. त्यामुळे मी हळूहळू माझी भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. या भूमिकेलाही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळो हीच इच्छा."

Web Title: marathi actor Sangram Salvi comeback on Star Pravah after Shivani Surve s comeback