'फुलपाखरू' मालिकेच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने मानस वैदेहीला भेटण्याची सुवर्णसंधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 14:39 IST2018-04-18T09:09:34+5:302018-04-18T14:39:34+5:30

अल्पावधीतच 'फुलपाखरू' या मालिकेने रसिकांची पसंती मिळाली आहे.मालिकेत वैदेही (हृता दुर्गुळे) तमाम तरूणांच्या हृदयाची धडकन आहे तर मानस (यशोमान ...

Manas Vaideh to meet the anniversary of 'Butterfly' series! | 'फुलपाखरू' मालिकेच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने मानस वैदेहीला भेटण्याची सुवर्णसंधी!

'फुलपाखरू' मालिकेच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने मानस वैदेहीला भेटण्याची सुवर्णसंधी!

्पावधीतच 'फुलपाखरू' या मालिकेने रसिकांची पसंती मिळाली आहे.मालिकेत वैदेही (हृता दुर्गुळे) तमाम तरूणांच्या हृदयाची धडकन आहे तर मानस (यशोमान आपटे) सगळ्या मुलींचा लाडका आहे.कॉलेजच्या अल्लड वयात जुळलेलं प्रेम... त्यांचा एकमेकांवरचा लटका राग… त्यांची खोडकर मस्ती... थोडे रुसवे - फुगवे... एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या मानस आणि वैदेहीची ही प्रेमकथा म्हणजे "फुलपाखरू"... या मालिकेला आता संपूर्ण वर्ष पूर्ण होत आहे.वर्षभर प्रेक्षकांनी या मालिकेला अमाप प्रेम दिलं आणि त्यामुळेच वर्षपूर्तीच्या निमित्ताने या मालिकेवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक खास सरप्राईज कॉन्टेस्टचे आयोजन केले आहे.'फुलपाखरू'मालिकेच्या वर्षपूर्तीच्या निम्मिताने प्रेक्षकांना आपल्या आवडत्या कलाकारांना भेटण्याची संधी मिळणार आहे.ही कॉन्टेस्ट १७ एप्रिल ते २१ एप्रिल पर्यंत झी युवा वाहिनीवर चालेल. या कॉन्टेस्टमध्ये रोज २ प्रश्न विचारले जातील.जे प्रश्नांची योग्य उत्तरे देतील त्यातील रोज ५ लकी विजेते संपूर्ण महाराष्ट्रातून वाहिनी निवडले जाणार आहे.५ दिवसात २५ विजेते निवडले जातील आणि त्या २५ जणांना फुलपाखरूच्या संपूर्ण टीम बरोबर वर्षपूर्तीची पार्टी सेलिब्रेट करण्यीची संधीही मिळणार आहे.

मालिकेत अनेक ट्विस्ट आणि टर्न पाहायला मिळत आहेत. सध्या मालिकेत सुरू असणा-या ट्रॅकनुसार प्रेमाच्या एक ना अनेक परिभाषा उलगडवत, मानस (यशोमान आपटे) आणि वैदेही (हृता दुर्गुळे) यांच्या नितांत सुंदर प्रेमाचा प्रवास आपल्या मनापर्यंत पोहोचवणारी झी युवावरील एक प्रेमळ मालिका म्हणजे "फुलपाखरू". रॉकीने वैदेहीला दिलेल्या चॅलेंजनुसार दोघेही पुर्ण तयारीनिशी एकमेकांसमोर उभे राहणार आहेत. मानस वैदेहीचा दोस्ती बँड त्यांच्यासमोर आलेल्या प्रत्येक संकटामधून मार्ग काढत जिंकण्याची पूर्ण तयारी करत आहे.समीरला झालेल्या अपघातानंतरही तो एका हाताने का होईना पण ड्रम वाजवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याची जिद्द पाहून त्याचे सर्व साथीदार त्याला सपोर्ट करतायेत.मानसला त्याच्या बाबांच्या तब्येतीमुळे टेन्शन आलं होतं, ज्यामुळे मानस बँड सोडण्याचा विचार करत होता पण त्याच्या बाबांनीच मानस आणि वैदेहीला निक्षून सांगितलं की,कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला ही कॉम्पिटिशन जिंकायची आहे.त्यामुळे मानस वैदेहीने नव्या जोमाने पुन्हा प्रॅक्टिस सुरु केली आहे.दुसरीकडे माया आणि रॉकी दोस्ती बँडला अजून अडचणीत कसं आणता येईल यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करत आहेत.

Web Title: Manas Vaideh to meet the anniversary of 'Butterfly' series!