'ओंकार भोजनेला परत आणा'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पुन्हा सुरु होण्यापूर्वीच प्रेक्षकांची जोरदार मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 11:18 AM2023-07-31T11:18:21+5:302023-07-31T11:18:58+5:30

Onkar bhojane: येत्या १४ ऑगस्टपासून महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी येणार आहे.

maharashtrachi-hasyajatra-new-season-starting-from-14th-august-promo-is-out | 'ओंकार भोजनेला परत आणा'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पुन्हा सुरु होण्यापूर्वीच प्रेक्षकांची जोरदार मागणी

'ओंकार भोजनेला परत आणा'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पुन्हा सुरु होण्यापूर्वीच प्रेक्षकांची जोरदार मागणी

googlenewsNext

छोट्या पडद्यावर तुफान  लोकप्रिय असलेला कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा. गेल्या काही वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहे. त्यामुळे या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार आज प्रेक्षकांना जवळचा वाटतो. यात अलिकडेच या कार्यक्रमाचा एक नवीन प्रोमो समोर आला. यात ओंकार भोजने  (Onkar bhojane) दिसत नसल्यामुळे त्याला मालिकेत आणा अशी मागणी चाहत्यांमधून होऊ लागली आहे.

गेल्या काही दिवसांपासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने ब्रेक घेतला होता. मात्र, आता पुन्हा एकदा नव्या हंगामासह हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्याने सुरु होणाऱ्या कार्यक्रमात प्रियदर्शिनी इंदळकर, वनिता खरात, समीर चौघुले, इशा डे, शिवाली परब आणि दत्तू मोरे दिसत आहेत. विशेष म्हणजे प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये विशाखा सुभेदार आणि ओंकार भोजने दिसत नाहीयेत. त्यामुळे या कार्यक्रमात पुन्हा ओंकारला आणा ही एकच मागणी चाहते करत आहेत.

काय आहे चाहत्यांची मागणी?

सोनी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील अनेक कलाकार दिसून येत आहेत. मात्र, ओंकार दिसत नसल्यामुळे त्याला कार्यक्रमात पुन्हा बोलवा अशी मागणी चाहते करु लागले आहेत. ओमकार भोजने ला परत नक्की घ्या तरच मज्जा येईल, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, तो PP नसला तरी चालतील परंतु ओंकार भोजने यांना राहुद्या सर, असं अन्य दुसऱ्या युजरने म्हटलं आहे.

दरम्यान, येत्या १४ ऑगस्टपासून महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी येणार आहे. सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येईल.
 

Web Title: maharashtrachi-hasyajatra-new-season-starting-from-14th-august-promo-is-out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.