तूच बोलली स्वत:च्या 'हाताने', नम्रताचा लेकही करतोय तुफान 'कॉमेडी', Video एकदा बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 13:22 IST2023-11-07T13:21:11+5:302023-11-07T13:22:28+5:30
रुद्राजची ही अॅक्टिंग आणि त्याचे जोक्स चाहतेही एन्जॉय करत आहेत

तूच बोलली स्वत:च्या 'हाताने', नम्रताचा लेकही करतोय तुफान 'कॉमेडी', Video एकदा बघाच
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) नेहमीच हास्यजत्रेच्या मंचावर धुमाकूळ घालते. तिचे हावभाव, विनोदांचं परफेक्ट टायमिंग यामुळे आपोआपच प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू येतं. तिचं हेच विनोदाचं टॅलेंट तिच्या मुलातही उतरलं आहे. नम्रताला रुद्राज हा ६ वर्षांचा मुलगा आहे. त्याची घरात काय धमाल मस्ती सुरु असते याची झलक नम्रता सोशल मीडियावर दाखवत असते.
नम्रताने एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केलाय. यामध्ये तिचा लेक रुद्राज बोलताना दिसतोय. रुद्राजला स्वत:च ज्युस घेत असतो. तेव्हा नम्रता म्हणते काय करतोय तू? तर रुद्राज म्हणतो, मी हा ज्यूस घेतलाय प्यायला. तर नम्रता म्हणते, अरे आजी ओरडेल ना...तर रुद्राज म्हणतो, मी आयडिया केली आहे. हा ज्युस मी कपमध्ये घेतलाय. त्यामुळे आजीला वाटेल हे पाणीच आहे. नम्रता म्हणते, ही तुझी आयडिया फ्लॉप आहे. यावर रुद्राज म्हणतो, तुझी रेकॉर्डिंग फ्लॉप आहे. नम्रता म्हणते, कोण बोललं माझी रेकॉर्डिंग फ्लॉप आहे..रुद्राज म्हणतो, तूच बोलली स्वत:च्या हाताने..नम्रता म्हणते, हाताने? हाताने कोण बोलतं? यावर रुद्राज गोड हसतो.
रुद्राजची ही अॅक्टिंग आणि त्याचे जोक्स चाहतेही एन्जॉय करत आहेत. 'रुद्राज म्हणतोय माझी acting बघा , मी शूट केलं तर म्हणतोय आई तुझी recording flop आहे' असं कॅप्शन नम्रताने दिलं आहे. रुद्राजचे असे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात.