झुपकेदार केसांच्या गौरव मोरेचा झाला मेकओव्हर, नेटिझन्सनी केलेल्या धमाल कमेंट्स, म्हणाले- गरुडपुराणात....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 03:18 PM2023-08-22T15:18:54+5:302023-08-22T17:59:14+5:30

बदलेल्या हेअरस्टाईलमध्ये गौरव मोरे कसा दिसतो हे पाहण्याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे.

Maharashtrachi hasya jatra gaurav more changes his hairstyle, samir choughule share his photo on social media | झुपकेदार केसांच्या गौरव मोरेचा झाला मेकओव्हर, नेटिझन्सनी केलेल्या धमाल कमेंट्स, म्हणाले- गरुडपुराणात....

झुपकेदार केसांच्या गौरव मोरेचा झाला मेकओव्हर, नेटिझन्सनी केलेल्या धमाल कमेंट्स, म्हणाले- गरुडपुराणात....

छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लाडका शो आहे. महाराष्ट्राच्या घराघरात या शोचे चाहते आहेत. हा विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळवून हसवतो. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’  शोमधून अभिनेता गौरव मोरे घराघरात पोहोचला असून त्याने प्रेक्षकांच्या मनातही घर केलं आहे. विनोदीबुद्धी आणि अभिनय कौशल्याने त्याने अल्पावधीतच कलाविश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. याच कार्यक्रमातून गौरव घराघरात पोहोचला. विनोदाचं अचूक टायमिंग आणि त्यांची झुपकेदा केसांची हेअरस्टाईल त्याला लोकप्रिय करत गेली.

फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख असलेल्या गौरवने हेअरस्टाईल बदलली अन् त्याचं आयुष्यचं बदलून गेलं की काय, असेच म्हणावे लागेल. पण आता गौरव मोरेने झुपकेदा केसांची त्याची प्रसिद्ध हेअर स्टाईल बदलली आहे. होय, हे खरं आहे फिल्टरपाड्याच्या बच्चनने आपली हेअर स्टाईल बदलली आहे. याचा उलगडा समीर चौगुले यांच्या पोस्टमधून झाला आहे. समीर यांनी गौरवचा नव्या हेअरस्टाईलमधला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


या फोटोमध्ये गौरवे त्याचे केस कापलेले दिसतायेत. समीर चौगुले कॅमेऱ्याकडे बघतायेत तर काळ्या रंगाच्या टीशर्टमध्ये आलेल्य गौरवची फोटोत वनसाईडचं दिसतेय. हा फोटो शेअर करताना आमच्या हास्यजत्रेत नवीन अभिनेत्याचे पदार्पण..असं कॅप्शन त्यांनी या फोटोसोबत दिलंय.

यावर नम्रता संभेरावने,''समीर चौघुले नी दिली आनंदाची बातमी त्यांच्याकडे झाले नव्या पाहुण्याचे आगमन मुखडा पाहून व्हाल थक्क'' अशी कमेंट केली मजेशीर कमेंटदेखील केलीय. नेटकऱ्यांनी देखील यावर भन्नाट कमेंट केल्यात. एकाने यूजर्सने लिहिले, ''गौरव ने केस कापले ....... गरुडपुरान मे इस्के लिये अलग सजा है कोण होतास तू ?.? कसा झालास तू.'' आणखी एकाने लिहिले, हिरा कोंदनातून थोडासा बाहेर आला. खुप छान दिसतं आहेस. 

Web Title: Maharashtrachi hasya jatra gaurav more changes his hairstyle, samir choughule share his photo on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.