​कुल्फीकुमार बाजेवाला फेम आकृती शर्माला भेटायचे आहे माधुरी दीक्षित आणि हेमा मालिनीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 17:06 IST2018-03-06T11:36:07+5:302018-03-06T17:06:07+5:30

स्टार प्लसवरील कुल्फीकुमार बाजेवाला या आगामी संगीतमय मालिकेत कुल्फीची भूमिका साकारणारऱ्या आकृती शर्माने आपल्या अभिनयाने, निरागस रूपाने आणि प्रभावी ...

Madhuri Dixit and Hema Malini want to meet Kulfipikumar Baajwala Fame | ​कुल्फीकुमार बाजेवाला फेम आकृती शर्माला भेटायचे आहे माधुरी दीक्षित आणि हेमा मालिनीला

​कुल्फीकुमार बाजेवाला फेम आकृती शर्माला भेटायचे आहे माधुरी दीक्षित आणि हेमा मालिनीला

टार प्लसवरील कुल्फीकुमार बाजेवाला या आगामी संगीतमय मालिकेत कुल्फीची भूमिका साकारणारऱ्या आकृती शर्माने आपल्या अभिनयाने, निरागस रूपाने आणि प्रभावी भावनाविष्काराने प्रेक्षकांचे चांगलेच मन जिंकले आहे. या चिमुरड्या बालकलाकाराची प्रेरणा कोण आहे, हे नुकतेच तिने तिच्या एका मुलाखतीत सांगितले आहे.
आपल्या या पहिल्याच टीव्ही मालिकेबद्दल उत्सुक असलेली आकृती सांगते, माधुरी दीक्षित आणि हेमा मालिनी या दोन अभिनेत्री माझ्यासाठी प्रेरणास्थान आहेत. मी या दोघींची नृत्ये आणि अभिनय वारंवार पाहते आणि त्यांचा उपयोग माझी भूमिका साकारण्यासाठी करते. माधुरी मॅडम आणि हेमा मॅडम या माझ्या सर्वात आवडत्या अभिनेत्री आहेत. त्यांच्यामुळेच माझ्यात अभिनय आणि नृत्याची आवड उत्पन्न झाली. मला मोठेपणी त्यांच्याइतकीच उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना व्हायचे असून एक दिवस मी त्यांची भेट घेईन. ‘शोले’मधले हेमा मॅडमचे सर्व संवाद मला तोंडपाठ असून माधुरी मॅडमचे ‘एक दो तीन’ गाण्यावरील नृत्य मी झोपेतही करू शकते.”
कुल्फी ही अतिशय आनंदी, स्वच्छंदी, मिश्किल आणि निरागस स्वभावाची, सदा हसतमुख असणारी मुलगी आहे. आपल्या आवडत्या सलवार-कुर्ता, स्पोर्टस शूज आणि केसांची छानशी बांधलेली पोनी टेल अशा अवतारात कुल्फी आपल्या गावातील गल्लीबोळांतून नव्या गोष्टींचा शोध घेत फिरताना आपल्याला दिसत आहे. या मालिकेच्या संकल्पनेविषयी निर्मात्या गुल खान सांगतात, “कुल्फी ही एक अशी मुलगी आहे की, तिच्यासाठी तुम्ही आपल्या साऱ्या चिंता आणि काळजी विसरून जाल आणि तिच्यासोबत तिच्या संगीतमय प्रवासाचे साथीदार व्हाल. तिच्या नावाप्रमाणेच आमची ही चिमुरडी अगदी गोड आहे. ही एका मुलीची आणि तिच्या संगीताची कथा आहे. या मुलीत कोणत्याही आवाजातील नाद (किंवा लय) अचूक पकडण्याची शक्ती आहे. टीव्हीवरील काल्पनिक मनोरंजन मालिकांमध्ये अशी संगीतमय मालिका यापूर्वी कधी सादर झालेली नाही. संगीताच्या माध्यमातून एका लहान मुलीच्या भावना व्यक्त करणारी ही हृदयस्पर्शी कथा आहे.”
कुल्फी कुमार बाजेवाला या मालिकेत मोहित मलिक, अंजली आनंद, पल्लवी राव,  मेहुल बुच आणि श्रृती शर्मा असे अनेक नामवंत कलाकार प्रेक्षकांना महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

Also Read : कुल्फी कुमार बाजेवाला या मालिकेसाठी खास बनवली जात आहेत गाणी

Web Title: Madhuri Dixit and Hema Malini want to meet Kulfipikumar Baajwala Fame