​अन्नु कपूर आणि अक्षय कुमारच्या उपस्थितीत रंगणार सारेगमप घे पंगा कर दंगाचा लाईव्ह महाअंतिम सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 11:14 IST2018-01-04T05:44:17+5:302018-01-04T11:14:17+5:30

सारेगमपची जुनी परंपरा मोडत या पर्वाची सुरुवात झाली आणि महाराष्ट्रभरातून ३६ पंगेखोर निवडले गेले, त्यापैकी १२ पंगेखोर घे पंगा ...

The live legend of the riot took place in the presence of Annu Kapoor and Akshay Kumar. | ​अन्नु कपूर आणि अक्षय कुमारच्या उपस्थितीत रंगणार सारेगमप घे पंगा कर दंगाचा लाईव्ह महाअंतिम सोहळा

​अन्नु कपूर आणि अक्षय कुमारच्या उपस्थितीत रंगणार सारेगमप घे पंगा कर दंगाचा लाईव्ह महाअंतिम सोहळा

रेगमपची जुनी परंपरा मोडत या पर्वाची सुरुवात झाली आणि महाराष्ट्रभरातून ३६ पंगेखोर निवडले गेले, त्यापैकी १२ पंगेखोर घे पंगा कर दंगा म्हणत, महाअंतिम सोहळ्यात पोहोचले आहेत.
मराठी टेलिव्हिजन विश्वात प्रथमच हा महाअंतिम सोहळा वेगळ्या पद्धतीने आकार घेत आहे. या रविवारी म्हणजेच ७ जानेवारीला दुपारी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत हा सोहळा “लाईव्ह” रंगणार आहे. यातूनच आपल्याला या पर्वाचा "पंगेखोर" महाविजेता मिळणार आहे, महाविजेत्याला ५ लाखाचे बक्षिस मिळणार असून त्याला झी मराठीच्या मालिकेचे शीर्षक गीत देखील गाण्याची संधी मिळणार आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावरील विजेत्याला ३ लाख तर तिसऱ्या क्रमांकावरील विजेत्याला २ लाख रुपये मिळणार आहे. तसेच या दोघांनाही झी मराठीच्या मालिकेचे शीर्षक गीत गाण्याची संधी मिळणार आहे.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे घरबसल्या प्रेक्षकांनाही १ लाखाचं बक्षिस जिंकता येणार आहे . प्रेक्षक घर बसल्या महाविजेत्याबद्दल अंदाज बांधू शकतात. जे प्रेक्षक अचूक अंदाज बांधू शकतील, त्यापैकी एका भाग्यवान विजेत्याला एक लाखाचं बक्षिस मिळणार आहे. विजेता निवडण्यासाठी प्रेक्षकांना पुष्कर श्रोत्री, वैभव मांगले, मनवा नाईक, निलेश मोहरीर आणि हृषिकेश जोशी यांसारखे कलाकार मदत करणार आहेत. न्यूज चॅनेलवर ज्याप्रमाणे एक्झिट पोल असतो, त्याचप्रमाणे इथे देखील या कलाकारांचे स्पेशल पॅनल असणार आहे, जे आपल्याला अधूनमधून भेटत महाअंतिम सोहळ्याच्या निकालावर प्रकाश टाकणार आहेत. या आगळ्यावेगळ्या पॅनलचे सूत्रसंचालन प्रियदर्शन जाधव करणार आहे. या सोहळ्यात रवी जाधव, बेला शेंडे आणि स्वानंद किरकिरे या परीक्षकांसोबत अन्नु कपूर हे विशेष परीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच अक्षय कुमार देखील सारेगमप महाअंतिम सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.
सारेगमप घे पंगा कर दंगा या कार्यक्रमाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. प्रत्येक स्पर्धक आपला सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स देण्यासाठी प्रयत्न करत आहे. 

Also Read : ​अक्षय कुमार म्हणतो, ट्विंकल खनाला आमचे फॅमिली डॉक्टरही घाबरतात

Web Title: The live legend of the riot took place in the presence of Annu Kapoor and Akshay Kumar.