५७ व्या वर्षी 'हा' अभिनेता पुन्हा चढला बोहल्यावर; पत्नीची इच्छा केली पूर्ण, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 12:32 IST2026-04-03T12:30:26+5:302026-04-03T12:32:42+5:30
वयाच्या ५७ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याने विधीवत लग्न करुन पत्नीची इच्छा पूर्ण केली आहे. अभिनेत्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

५७ व्या वर्षी 'हा' अभिनेता पुन्हा चढला बोहल्यावर; पत्नीची इच्छा केली पूर्ण, फोटो व्हायरल
'खिचडी' आणि 'साराभाई व्हर्सेस साराभाई' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते जेडी मजेठिया (JD Majethia) सध्या त्यांच्या फोटोंमुळे चर्चेत आले आहेत. वयाच्या ५७ व्या वर्षी जेडी मजेठिया यांनी पुन्हा लग्न केले असून त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत, अशी चर्चा रंगली होती. मात्र, या फोटोंमागचे सत्य आता समोर आले आहे.
अभिनेता पुन्हा चढला बोहल्यावर
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये जेडी मजेठिया यांच्यासोबत त्यांची पत्नी निपा मजेठिया दिसत आहेत. हे दोघेही नवरा-नवरीच्या रूपात नटलेले पाहायला मिळत आहेत. जेडी मजेठिया आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या लग्नाचा ३० वा वाढदिवस 'पुनर्विवाह' करून साजरा केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या लग्नाची सर्व तयारी त्यांच्या मुलीने केली होती.
जेडी मजेठिया आणि निपा यांनी ३० वर्षांपूर्वी अत्यंत घाईत लग्न केलं होतं. कोर्ट मॅरेज करुन कामाच्या व्यस्त दिनक्रमामुळे दोघेही लग्नानंतर आपापल्या कामात गुंतले. त्यामुळे विधीवत लग्न करण्याची निपा यांची इच्छा होती. लग्नाच्या वाढदिवशी पत्नीची ही इच्छा जेडींनी पूर्ण केली. या दोघांचे फोटो व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. "प्रेम व्यक्त करण्यासाठी वयाचे बंधन नसते," अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे. दोघांच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

