करिना कपूरने या कारणामुळे हिना खानची केली स्तुती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 17:17 IST2018-02-23T11:47:45+5:302018-02-23T17:17:45+5:30

काही कलाकार फिटनेस फ्रिक असतात.कधी हे कलाकार तासनतास जिममध्ये घाम गाळतात.दुसरीकडे अभिनेत्री भूमिकेतील परफेक्शनसाठी किंवा झीरो फिगरसाठीही अहोरात्र मेहनत ...

Kareena Kapoor praised Hina Khan for this reason | करिना कपूरने या कारणामुळे हिना खानची केली स्तुती

करिना कपूरने या कारणामुळे हिना खानची केली स्तुती

ही कलाकार फिटनेस फ्रिक असतात.कधी हे कलाकार तासनतास जिममध्ये घाम गाळतात.दुसरीकडे अभिनेत्री भूमिकेतील परफेक्शनसाठी किंवा झीरो फिगरसाठीही अहोरात्र मेहनत करतात,डायट करतात हेसुद्धा आपण पाहिले आहे.हे एखाद्या सिनेमासाठी किंवा मालिकेसाठी कलाकार करत असतात.मात्र काही कलाकार असे असतात की व्यायाम,फिटनेस हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असतो. आपल्या बॉडीवर हे कलाकार प्रचंड मेहनत घेत असतात.बॉलिवूडमध्ये झिरो साईज फिगरमुळे बंगम करिना कपूरने घेतलेली मेहनत सा-यांनाच माहिती आहे.  बॉलिवूडच्या हिरोईन्स स्वतहाची स्तूती करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत.. मात्र करिना कपूर स्वतहाची सोडून दुस-या एका एक्ट्रेसच्या सौदर्यांची स्तुती करतेयं. त्या एक्ट्रेसची फिगर,अदा आणि अप्रतिम सौंदर्याची करिनालाही कमाल वाटतेयं.. कोण आहे ती एक्ट्रेस जिनं करिनाला घायाळ केलंयं. तर ती आहे छोट्या पडद्यावरची अक्षरा बहु आणि खतरों के खिलाडी सिझन 8,बिग बॉस 11 मध्ये झळकलेली हिना खान.होय.हिनाच्या झिरो साईज फिगरची करिना कपूरही दीवानी झाली आहे.हिना खान  खाण्या पिण्यामध्येही ती काटेकोरपणे शिस्त बाळगते. फिटनेस आणि ट्रेनिंगकडे दुर्लक्ष केलं नाही. प्रत्येक कलाकाराला स्टारडम हे हवं असतं त्याशिवाय त्याची गाडी  या इंडस्ट्रीत  सुसाट धावूच शकत नाही.....किती तरी येतात आणि जातात...पण स्टारडम मिळवणं हे खूपचं कठीण असतं....हे बहुदातर आता हिनालाही कळाले आहे.त्यामुळेच सध्या ती इतर गोष्टींपेक्षा जास्त फिटनेसवरच आपले लक्ष केंद्रीत करत असल्याचे पाहायला मिळत आहे. जर तुम्हालाही झिरो फिगर हवी असेल तर करिनाची ही ब्युटी टिप्स तुमच्यासाठी नक्कीच महत्वाची ठरेल.आता तिला अनेक मालिकांच्या ऑफर्स येत आहेत.मात्र पुन्हा मालिका करण्यात तिला रस नसल्याचे तिने म्हटले आहे.आता कुठे इमेज ब्रेक करण्यात हिना यशस्वी ठरली आहे.त्यामुळे पुन्हा मालिका करण्यास तिने नकार दिला आहे.आता रिअॅलिटी शो बरोबरच तिला बॉलिवूडमध्येही एंट्री करण्याची इच्छा आहे. त्यामुळे आता बॉलिवूडचे तिकीट कधी मिळणार याकडेच हिनाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Kareena Kapoor praised Hina Khan for this reason