तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राचं लग्न कधी? अभिनेत्याचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 11:17 IST2024-04-03T11:16:11+5:302024-04-03T11:17:58+5:30

करण व तेजस्वी विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Karan Kundrra on marriage plans with Tejasswi Prakash | तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राचं लग्न कधी? अभिनेत्याचा खुलासा

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राचं लग्न कधी? अभिनेत्याचा खुलासा

करण कुंद्रातेजस्वी प्रकाश ही टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय जोडी आहे. करण व तेजस्वी गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं आहे. करण कुंद्रा आणि तेजस्वीच्या चाहत्यांना त्यांची केमिस्ट्री प्रचंड आवडते. करण आणि तेजस्वी दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे. चाहते त्यांना 'तेजरन' म्हणून हाक मारतात. करण व तेजस्वी विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. करणने एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्याने या चर्चांना उधाण आलं आहे.

'लव्ह अधुरा' या शोच्या प्रमोशनसाठी करण कुंद्राने 'द इंडियन एक्स्प्रेस'ला मुलाखत दिली. यावेळी त्याच्यासोबत सहकलाकार एरिका फर्नांडिसही होती. यावेळी एका गेमिंग राऊंडदरम्यान दोघांना एकमेकांसाठी लग्नाच्या जाहिराती तयार करण्यास सांगण्यात आलं. यावर एरिकाने गमतीनं म्हटलं,  'करण लग्नाचा अजिबात विचार करत नाही'. मात्र, तिला प्रत्युत्तर देताना करण कुंद्रा मजेशीर स्वरात म्हणाला, 'काळ बदलायला वेळ लागत नाही. माझ्या मुलाखती या शोच्या ट्रेलरप्रमाणेच दिशाभूल करणाऱ्या आहेत'.

सलमान खानच्या 'बिग बॉस 15'मध्ये (Bigg Boss 16) तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. तेसस्वी प्रकाश या पर्वाची विजेती ठरली होती. बिग बॉसच्या घरात तेजस्वी आणि करणची मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. बिग बॉसनंतर तेजस्वी एकता कपूरच्या'नागिन 6' या मालिकेत झळकली. तर करणने छोट्या पडद्यावरील काही कार्यक्रम होस्ट केले. दोघांनीही सध्या आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रित केले आहे.
 

Web Title: Karan Kundrra on marriage plans with Tejasswi Prakash