​सुपर डान्सर २ च्या सेटवर इलियाना डिक्रूझने ताज्या केल्या बर्फीच्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 17:40 IST2018-03-09T12:10:46+5:302018-03-09T17:40:46+5:30

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील डान्स रिअॅलिटी शो सुपर डान्सर २ मध्ये सगळेच स्पर्धक एकाहून एक परफॉर्मन्स सादर करत आहेत. देशभरातील ...

Ileana D'Cruz remembers fresh snowballs on Super Dancer 2's set | ​सुपर डान्सर २ च्या सेटवर इलियाना डिक्रूझने ताज्या केल्या बर्फीच्या आठवणी

​सुपर डान्सर २ च्या सेटवर इलियाना डिक्रूझने ताज्या केल्या बर्फीच्या आठवणी

नी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील डान्स रिअॅलिटी शो सुपर डान्सर २ मध्ये सगळेच स्पर्धक एकाहून एक परफॉर्मन्स सादर करत आहेत. देशभरातील अतिशय प्रतिभावान स्पर्धकांमुळे स्पर्धेने वेगळीच पातळी गाठली आहे. आपल्या रेड या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इलियाना डिक्रूझ आणि अजय देवगण सुपर डान्सर २ च्या सेटवर नुकतेच आले होते. सुपर डान्सरच्या या भागात इलियाना डिक्रूझ आणि तिला बर्फी चित्रपटातून लाँच करणारा दिग्दर्शक अनुराग बासू यांना आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात शिल्पा शेट्टी, गीता कपूर आणि अनुराग बासू परीक्षकाची भूमिका साकारत आहेत.
सुपर डान्सर या कार्यक्रमाच्या आगामी भागाचे नुकतेच चित्रीकरण करण्यात आले. त्यावेळी रितीक आणि प्रतीक यांनी आपल्या एरियल अॅक्टने परीक्षकांना अचंबित करून सोडले. शगुन आणि ऐश्वर्या यांच्या नृत्यानंतर तर परीक्षक आणि अतिथी कलाकारांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या. तसेच सुपर डान्सर विवेक आणि सुपर गुरू आकाश थापा यांनी बर्फीच्या शीर्षक गीतावर एक गोड अॅक्ट सादर केला, तो पाहून इलियानाच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. इलियाना हे नृत्य पाहून इतकी भारावून गेली होती की, तिने आकाशला मिठी मारली आणि हा अॅक्ट करताना तो रणबीरपेक्षाही जास्त गोड दिसत होता असे सांगून त्याला दाद दिली. यावर अनुराग बासूने सांगितले, जर मला बर्फीचे हे गीत पुन्हा करण्याची वेळ आली तर मी नक्कीच आकाश थापाला त्यात घेईल. कारण त्याचे सादरीकरण निर्दोष आणि हावभाव उत्कृष्ट आहेत. 
इलियाना डिक्रूझने आकाशसोबत ‘तू मेरे अगल बगल है’ गीतावर नृत्य करून आपल्या शुभेच्छा आणि प्रेम व्यक्त केले आणि अनुराग बासू देखील त्या नृत्यात सामील झाला. या निमित्ताने इलियाना आणि अनुराग बासू ही बर्फी या चित्रपटाची टीम पुन्हा एकत्र आली. सुपर डान्सर २ हा शो आता अंतिम भागापासून फक्त दोन आठवडे दूर आहे. अशावेळी त्यातील स्पर्धा अगदी अटीतटीची झाली आहे आणि स्पर्धा जिंकण्यासाठी प्रत्येक स्पर्धक प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. या कार्यक्रमात कोणता स्पर्धक जिंकतो याची आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. 

Also Read : बॉयफ्रेन्डसोबत ‘लिपलॉक’ करताना दिसली इलियाना डिक्रूज!

 

 

 

 

Web Title: Ileana D'Cruz remembers fresh snowballs on Super Dancer 2's set