‘जजबात... संगीन से नमकीन तक’ या मालिकेत हितेन तेजवाणी आणि हुसैन कुवाजेरवाला यांनी सांगितले हे सिक्रेट्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 18:00 IST2018-07-14T13:03:41+5:302018-07-14T18:00:00+5:30

‘जजबात... संगीन से नमकीन तक’ या कार्यक्रमाच्या येत्या वीकेण्डच्या भागात टीव्हीवरील दोन सर्वात लाडके अभिनेते हितेन तेजवाणी आणि हुसैन कुवाजेरवाला सूत्रसंचालक राजीव खंडेलवाल यांच्याशी हलकाफुलका संवाद साधताना दिसणार आहेत.

Hiten Tejwani and Hussain Kuwajarwala in the series 'Jajabat ... from sage to salty' said the secret | ‘जजबात... संगीन से नमकीन तक’ या मालिकेत हितेन तेजवाणी आणि हुसैन कुवाजेरवाला यांनी सांगितले हे सिक्रेट्स

‘जजबात... संगीन से नमकीन तक’ या मालिकेत हितेन तेजवाणी आणि हुसैन कुवाजेरवाला यांनी सांगितले हे सिक्रेट्स

‘झी टीव्ही’वर प्रसारित होणाऱ्या ‘जजबात... संगीन से नमकीन तक’ या चॅट शो द्वारे आतापर्यंत प्रेक्षकांना रोहित आणि रोनित रॉय, अदा खान, दिव्यांका त्रिपाठी, विवेक दाहिया, धीरज धूपर, राखी सावंत, बरून सोबती, करण पटेल, आक्षका गोराडिया या आणि इतर अनेक लोकप्रिय टीव्ही कलाकारांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल माहिती मिळाली आहे. 

आता या कार्यक्रमाच्या येत्या वीकेण्डच्या भागात टीव्हीवरील दोन सर्वात लाडके अभिनेते हितेन तेजवाणी आणि हुसैन कुवाजेरवाला सूत्रसंचालक राजीव खंडेलवाल यांच्याशी हलकाफुलका संवाद साधताना दिसणार आहेत. आपल्या जीवनातील काही महत्त्वाच्या आठवणी आणि किस्से ते सांगणार आहेत. या गप्पांमध्ये या दोन्ही देखण्या नायकांनी मनोरंजनाच्या क्षेत्रात आल्यापासून आपल्याला कोणता संघर्ष करावा लागला आणि आपला आजवरचा प्रवास कसा पार पडला, त्याची माहिती दिली. तसेच त्यांनी या कार्यक्रमात काही मनोरंजक आणि विनोदी खेळांमध्ये भाग घेतला. रॅपिड फायरच्या फेरीत राजीव खंडेलवालने त्यांना विचारले की, त्यांना सध्या टीव्हीवर सर्वात लोकप्रिय असलेल्या कोणत्या मालिकेत नायकाची भूमिका साकारायला आवडेल. ये है मोहब्बतें, कुमकुम भाग्य आणि कुंडली भाग्य या मालिकांतील नायक अनुक्रमे करण पटेल, धीरज धूपर आणि शब्बीर आहुवालिया यांच्यापैकी कोणत्या नायकाच्या जागी त्यांना भूमिका रंगवायला आवडेल, असे विचारल्यावर हितेनने आपला मित्र धीरज धूपरचे तर हुसैनने शब्बीर आहुवालियाचे नाव घेतले. याविषयी हितेन सांगतो, “हे तिघेही कलाकार माझे मित्र आहेत. पण त्यांच्यापैकी एकाची जागा मला घ्यायचीच असेल, तर ठीक आहे, धीरज धूपरची जागा मी घेतो. बाकीच्या दोघांना त्यांच्या जागी राहू द्या.”

या हलक्याफुलक्या गप्पांपूर्वी हितेन आणि हुसेन यांनी कार्यक्रमात सायकलवर बसून मोठ्या झोकात प्रवेश केला. त्यांच्या मिश्किल बोलण्याने सेटवर हास्याची कारंजी उडत होती. पण नंतर हितेन आणि आर्शी खान यांनी एक करमणूकप्रधान आयटम सादर करून प्रेक्षकांना खूश करून टाकले.
‘जजबात... संगीन से नमकीन तक’चा हा भाग देखील प्रेक्षकांना आवडेल अशी सगळ्यांना खात्री आहे. 


 

Web Title: Hiten Tejwani and Hussain Kuwajarwala in the series 'Jajabat ... from sage to salty' said the secret