​‘कृष्णा चली लंडन’ मालिकेसाठी या अभिनेत्रीने सोडली आपली चित्रपटसृष्टीतील कारकीर्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 12:48 IST2018-05-22T07:18:43+5:302018-05-22T12:48:43+5:30

‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ या नव्या मालिकेत कृष्णा या नायिकेची भूमिका रंगविणारी मेघा चक्रबोर्ती ही कोलकात्यातील बंगाली मालिका ...

His acting career left the film for 'Krishna Walk in London' | ​‘कृष्णा चली लंडन’ मालिकेसाठी या अभिनेत्रीने सोडली आपली चित्रपटसृष्टीतील कारकीर्द

​‘कृष्णा चली लंडन’ मालिकेसाठी या अभिनेत्रीने सोडली आपली चित्रपटसृष्टीतील कारकीर्द

्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ या नव्या मालिकेत कृष्णा या नायिकेची भूमिका रंगविणारी मेघा चक्रबोर्ती ही कोलकात्यातील बंगाली मालिका आणि चित्रपटांतील एक नामवंत अभिनेत्री आहे. ‘अ‍ॅक्शन’ या लोकप्रिय बंगाली चित्रपटाची नायिका आणि अनेक बंगाली मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका रंगविलेल्या अभिनेत्रीने नुकतेच मुंबईत स्थलांतर केले असून ती आता हिंदी टीव्ही मालिकांमधील भूमिकांवर आपले लक्ष केंद्रित करणार आहे. परिणामी तिला आपल्या बंगाली मालिका आणि चित्रपटांतील कारकिर्दीला सध्या तरी रामराम ठोकावा लागला आहे. आपल्या या निर्णयाबद्दल मेघा सांगते, “बंगाली मालिका आणि चित्रपट यांच्या पलीकडे मला माझ्या अभिनयाचे क्षितीज रुंदावायचे होते. त्यासाठी हिंदी मालिकांमध्ये भूमिका साकारणे ही माझ्यासाठी सर्वात उत्तम संधी होती. या निर्णयामुळे मी मलाच आव्हान देत होते, हे मला ठाऊक होतं आणि मला माझ्या अभिनयगुणांचा कस लावायचा होता. मुंबई ही प्रत्येक कलाकाराची स्वप्ननगरी असून मला एक ना एक दिवस इथे यावंच लागणार होतं.”
‘कृष्णा चली लंडन’मध्ये मेघा एका तल्लख बुद्धीच्या आणि अभ्यासू तरुणीची भूमिका रंगवणार आहे. ती एका छोट्या खेड्यातील असून तिच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कितीही मेहनत घेण्याची तिची तयारी आहे.
अभिनेत्री मेघा चक्रबोर्ती कृष्णा चली लंडन या तिच्या पहिल्या मालिकेसाठी सध्या चांगलीच मेहनत घेत आहे. मेघा ही मूळची कोलकात्याची रहिवासी आहे. कोलकात्यातच लहानाची मोठी झाल्याने तिला बंगालीपेक्षा अन्य कोणत्याही भाषेत बोलणे अवघड जाते. आता ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेत ती उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये राहणाऱ्या तरुणीची भूमिका साकारत आहे. त्यामुळे तिला तेथील स्थानिक भाषा आणि त्या भाषेचे उच्चार येणे भाग होते. तेव्हा मेघाने ती भाषा शिकण्यासाठी चक्क एका हिंदी शिक्षकाची शिकवणी सुरू केली आहे. 
कृष्णा चली लंडन’ ही कानपूरमधील २१ वर्षीय देखण्या राधेलालची कथा आहे. त्याच्या वयाच्या अन्य मुलांची स्वप्ने लक्षावधी रुपये कमाविणे, कंपनीत नोकरी करणे किंवा मित्रांबरोबर पार्टी करणे अशी स्वाभाविक असली, तरी राधेचे एकच स्वप्न असते- ते म्हणजे लग्न करणे! राधे हा तसा स्वप्नाळू स्वभावाचा असून आपल्या पत्नीच्या शोधात असतो. लग्नानंतर अगदी रोमँटिक जीवन जगण्याची त्याची कल्पना असते.

megha chakraborty

Also Read : 'कृष्णा चली लंडन'मध्ये मिथिला पारकर साकारणार ही भूमिका!
 

Web Title: His acting career left the film for 'Krishna Walk in London'