ब्रेस्ट कॅन्सरशी लढणाऱ्या हिनाने घेतलं बाप्पाचं दर्शन, नेटकऱ्यांच्या मात्र विचित्र कमेंट्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 13:59 IST2024-09-12T13:59:00+5:302024-09-12T13:59:28+5:30
हिना खान काल एकता कपूरच्या घरी गणपती दर्शनाला पोहोचली.

ब्रेस्ट कॅन्सरशी लढणाऱ्या हिनाने घेतलं बाप्पाचं दर्शन, नेटकऱ्यांच्या मात्र विचित्र कमेंट्स
अभिनेत्री हिना खान (Hina Khan) सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. तिच्या पाच किमोथेरपी पूर्ण झाल्या आहेत. हिना नेहमी सोशल मीडियावर तिच्या तब्येतीविषयी चाहत्यांना अपडेट देत असते. बरेचदा तिला प्रचंड वेदना होतात मात्र ती कायम हसतच या कॅन्सरला तोंड देत आहे. सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचं वातावरण आहे. हिना खाननेही नुकतंच गणपती दर्शन घेतलं. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
हिना खान काल एकता कपूरच्या घरी गणपती दर्शनाला पोहोचली. तिने पिवळ्या रंगाचा कोऑर्ड सेट घातला होता. तसंच डोक्यावर विग लावला होता. ती खूप अशक्त झाली असल्याचंही स्पष्ट जाणवत होतं. पापाराझींनी तिला कॅमेऱ्यात कैद केले. तेव्हा ती कॅमेऱ्यासपासून लपताना दिसली. यानंतर कारमध्ये बसून रवाना झाली.
हिना खानच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मात्र आक्षेपार्ह कमेंट्स केल्या आहेत. अनेकांना तिचं गणपती दर्शन करणं आवडलेलं नाही. 'कोणापासून लपतेय अल्लाह ला घाबर माणसांना नाही','मरणाला टेकली आहे तरी पूजा करते'. अशा कमेंट काही कट्टरांनी केल्या आहेत. तर चाहत्यांनी तिच्या हिंमतीला दाद दिली आहे. तसंच ती लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थनाही केली आहे.