माय लव्ह! अंगठी घालतानाचा तो क्षण, हार्दीकने Video पोस्ट करत बायकोला दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 10:40 IST2023-05-03T10:39:41+5:302023-05-03T10:40:03+5:30

रोमँटिक कॅप्शन देत हार्दीकने साखरपुड्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

hardeek joshi and akshaya deodhar first engagement anniversary actor posted video | माय लव्ह! अंगठी घालतानाचा तो क्षण, हार्दीकने Video पोस्ट करत बायकोला दिल्या शुभेच्छा

माय लव्ह! अंगठी घालतानाचा तो क्षण, हार्दीकने Video पोस्ट करत बायकोला दिल्या शुभेच्छा

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतली सुपरहिट जोडी हार्दीक (Hardeek Joshi)आणि अक्षया (Akshaya Deodhar) यांच्या साखरपुड्याला आज एक वर्ष पूर्ण झालं. एरवी अतिशय मितभाषी आणि सोशल मीडियावरही फारसा अॅक्टिव्ह नसलेल्या हार्दीकने आज मात्र बायकोवरचं प्रेम व्यक्त केलंय. 'माय गर्ल', 'माय लव्ह' असं म्हणत त्याने बायकोला शुभेच्छा दिल्या आहेत.

जानेवारी महिन्यात हार्दीक आणि अक्षरा विवाहबंधनात अडकले. पुण्यात अगदी थाटात विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. राणादा आणि पाठकबाईंचे फोटो पाहून चाहते खूपच खूश झाले. आज त्यांच्या साखरपुड्याला १ वर्ष पूर्ण झालंय. या निमित्ताने हार्दीकने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 'कहो ना प्यार है' या गाण्यावर त्याने रिंग सेरेमनीचा व्हिडिओ लावला आहे. हार्दीक गुडघ्यावर बसून अक्षयाला अंगठी घालतानाचा तो क्षण आहे. 

या रोमँटिक कपलचा हा गोड व्हिडिओ बघून चाहत्यांनीही कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडिओवर अक्षयानेही 'awww'अशी कमेंट केली आहे. हार्दीक आणि अक्षया काही दिवसांपूर्वीच परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेऊन परतले आहेत. त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडिटयावर व्हायरल झाले होते. हार्दीक सध्या महेश मांजरेकर यांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' या बिग बजेट सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. 

Web Title: hardeek joshi and akshaya deodhar first engagement anniversary actor posted video