सातारा हायवेवर गौतमी पाटीलने 'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर केला भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 10:37 IST2025-12-24T10:34:44+5:302025-12-24T10:37:39+5:30
'धुरंधर'च्या व्हायरल गाण्यावर गौतमी पाटीलने केला भन्नाट डान्स केला आहे. गौतमीने अक्षय खन्नाच्या डान्स स्टेपला हुबेहुब कॉपी केलं आहे

सातारा हायवेवर गौतमी पाटीलने 'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर केला भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल
सध्या बॉलिवूडमध्ये 'धुरंधर' सिनेमाची खूप चर्चा आहे. या सिनेमाची कथा गाजलीच शिवाय 'धुरंधर'ची गाणीही प्रेक्षकांना आवडली. 'धुरंधर' सिनेमा रिलीज झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी या सिनेमातील FA9LA हे गाणं चांगलंच गाजलं. विशेषतः या गाण्यावर अक्षय खन्नाने केलेली डान्स स्टेप चांगलीच व्हायरल झाली. त्यामुळे मराठीपासून हिंदीपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी ही डान्स स्टेप करण्याचा मोह आवरला नाही. अशातच नृत्यांगना गौतमी पाटीलने भर रस्त्यात या गाण्यावर डान्स करुन सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
'धुरंधर'च्या गाण्यावर गौतमीचा डान्स
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर गौतमीने भन्नाट डान्स केला आहे. गौतमीचा हा व्हायरल व्हिडीओ सातारा हायवेवरील एका टोलनाक्याजवळचा आहे. टोलनाक्याजवळ भर रस्त्यात गौतमी पाटीलने FA9LA गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. अक्षय खन्नाची व्हायरल स्टेप कॉपी करुन गौतमीने डोळ्यावर गॉगल लावून सुंदर अदा दाखवल्या आहेत. गाण्याच्या शेवटी गौतमीने ठुमकेही लगावले आहेत. गौतमीचा हा डान्स तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
गौतमीचा हा व्हिडीओ समोर येताच तिच्या चाहत्यांनी या व्हिडीओखाली लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी हार्ट इमोजी पोस्ट करुन गौतमी पाटीलच्या डान्सला पसंती दिली आहे. एकूणच सध्याच्या ट्रेंडिंग गाण्यावर गौतमी पाटीलने केलेला हा डान्स सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. गौतमी सध्या महाराष्ट्रातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये डान्स परफॉर्मन्स करताना दिसते.