अभिनेता गौरव सरीनला गोविंदाच्या रूपात भेटला गुरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 15:28 IST2018-05-15T09:58:02+5:302018-05-15T15:28:02+5:30

‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ या आगामी मालिकेत राधे या 21 वर्षीय तरुमाची मध्यवर्ती भूमिका रंगविणार्‍्या गौरव सरीनला उत्तर ...

Gaurav Sarin met Govinda as a teacher! | अभिनेता गौरव सरीनला गोविंदाच्या रूपात भेटला गुरू!

अभिनेता गौरव सरीनला गोविंदाच्या रूपात भेटला गुरू!

्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ या आगामी मालिकेत राधे या 21 वर्षीय तरुमाची मध्यवर्ती भूमिका रंगविणार्‍्या गौरव सरीनला उत्तर प्रदेशात वाढलेल्या या राधेची भूमिका साकारण्यासाठी बरीच मेहनत करावी लागली. राधेच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी आणि त्यासाठी प्रेरणा घेण्यासाठी गौरवने अभिनेता गोविंदाचे अनेक चित्रपट पाहिले.

या भूमिकेच्या अंतरंगात शिरण्यासाठी तसेच नृत्याच्या प्रसंगात गोविंदाचा पदन्यास शिकण्यासाठी गौरवने गोविंदाचे चित्रपट एक आठवडाभर पाहिले. गौरव म्हणाला, “मी उत्तर प्रदेशातील एका तरुणाची भूमिका साकारीत असल्याने मला तिथली भाषा आणि स्थानिक नृत्य येणं गरजेचं होतं. उत्तर प्रदेशात रूढ असलेल्या नृत्यांतील ठुमके आणि झुमक्यांसाठी गोविंदाची ख्याती आहे. आमच्या मालिकेचं बहुतांशी चित्रण कानपूर आणि लखनौ या शहरांतून झालं असून गोविंदाच्या चित्रपटांतून तेथील संस्कृतीचं दर्शन घडतं. माझ्या मालिकेत मला गोविंदासारख्या महान नर्तकाची नक्कल करण्याची संधी मिळत असल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. माझं नृत्य प्रेक्षकांना पाहायला आवडेल, अशी आशा करतो.” ‘कृष्णा चली लंडन’ ही कानपूरमधील 21 वर्षीय देखण्या राधेलालची कथा आहे. त्याच्या वयाच्या अन्य मुलांची स्वप्ने लक्षावधी रुपये कमाविणे, कंपनीत नोकरी करणे किंवा मित्रांबरोबर पार्टी करणे अशी स्वाभाविक असली, तरी राधेचे एकच स्वप्न असते- ते म्हणजे लग्न करणे! राधे हा तसा स्वप्नाळू स्वभावाचा असून आपल्या पत्नीच्या शोधात असतो.

 लग्नानंतर अगदी रोमँटिक जीवन जगण्याची त्याची कल्पना असते.तो स्वत: नववी इयत्ता नापास असला आणि त्याच्या जीवनात कोणतेही ध्येय व आकांक्षा नसल्या, तरी आपल्या पत्नीला आनंदी ठेवण्यासाठी तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याची त्याचा निर्धार असतो.त्याच्या कुटुंबात तो सर्वात लहान असल्याने सर्वांचा लाडका असतो.पण कौटुंबिक निर्णय प्रक्रियेत त्याला काही स्थान नसते. पण त्याचा निरागस आणि आकर्षक स्वभाव सर्वांचे मन जिंकून घेत असे.त्याला नृत्य करायला फार आवडतं.1990 च्या दशकातील गाण्यांचा तो चाहता असतो.आपल्याला जीवनात सर्व काही मिळाले आहे,अशी त्याची भावना असते- उत्तम कुटुंबीय, उत्तम मित्र, सुखाचे जीवन आणि आता त्याला त्याची पत्नी मिळाली की त्याचे जीवन परिपूर्ण होईल, अशी त्याची समजूत असते.

Web Title: Gaurav Sarin met Govinda as a teacher!