Bigg Boss 17मध्ये सोशल मीडियावरील या बिनधास्त बालाची एंट्री, जाणून घ्या कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 05:09 PM2023-12-22T17:09:13+5:302023-12-22T17:09:13+5:30

Bigg Boss 17 : बिग बॉस १७ मध्ये अलीकडेच कोरियन सिंगर ऑराने वाईल्ड कार्ड एन्ट्री केली. त्यानंतर आयशा खान शोमध्ये सहभागी झाली. घरात एन्ट्री केल्यानंतर बिग बॉसचा तगडा खेळाडू मुनाव्वर फारुकीचा संपूर्ण खेळ उद्ध्वस्त केला. आता आणखी एक वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे.

Entry of this social media influencer girl in Bigg Boss 17, know who she is? | Bigg Boss 17मध्ये सोशल मीडियावरील या बिनधास्त बालाची एंट्री, जाणून घ्या कोण आहे ती?

Bigg Boss 17मध्ये सोशल मीडियावरील या बिनधास्त बालाची एंट्री, जाणून घ्या कोण आहे ती?

बिग बॉस १७ (Bigg Boss 17) मध्ये अनेक ट्विस्ट्स पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. हा शो आता ११व्या आठवड्यात प्रवेश करणार आहे. त्यामुळे बिग बॉसचा खेळ आता रंजक होत चालला आहे. शोला रंजक बनवण्यासाठी निर्मातेही सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अलीकडेच, कोरियन गायिका ऑराने बिग बॉस १७ मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री केली आहे. त्यांच्यानंतर आयशा खान शोमध्ये सहभागी झाली. एंट्री करताच तिने बिग बॉसचा तगडा खेळाडू मुनावर फारुकी याचा संपूर्ण खेळ उद्ध्वस्त केला. आता आणखी एक वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे. 

शोमध्ये कोणाचा समावेश होणार?
यावेळी, बिग बॉस १७च्या निर्मात्यांनी एक बोल्ड सोशल मीडिया इन्फ्ल्युन्सर निवडला आहे, जिने यापूर्वी देखील प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे. टेली चक्करच्या रिपोर्टनुसार, मनीषा राणी लवकरच बिग बॉस १७मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून सामील होऊ शकते. मनीषा राणीने बिग बॉस ओटीटी सीझन २मध्ये यापूर्वीच तिची जादू दाखवली आहे. या शोमध्ये त्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. मनीषा राणीची बोलण्याची पद्धत असो, अभिषेक मल्हानसोबतची तिची बॉन्डिंग असो किंवा एल्विश यादवसोबत फ्लर्टिंग असो, तिची प्रत्येक शैली बिग बॉसच्या घरात मनोरंजक होती.

बिग बॉस १७मध्ये होणार धमाका 
अलीकडेच मनीषा राणीबद्दल बातमी आली होती की ती कलर्स शो झलक दिखला जा सीझन ११ मध्ये सहभागी होणार आहे. दरम्यान, आता हे अपडेट आले आहे की, मनीषा राणी झलक दिखला जामध्ये नाही तर बिग बॉस १७च्या घरात खळबळ माजवणार आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Web Title: Entry of this social media influencer girl in Bigg Boss 17, know who she is?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.