या कारणामुळे बिग बॉस मराठी हाऊसमध्ये झाला पुष्कर जोग, स्मिता गोंदकर आणि आस्ताद काळे यांच्यात वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 11:43 IST2018-05-10T06:13:03+5:302018-05-10T11:43:03+5:30

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज “खेळ मांडला” हे कार्य रंगणार असून घरातील सदस्यांची दोन गटामध्ये विभागणी करण्यात ...

Due to this reason Big Boss was in Marathi House, Pushkar Jog, Smita Gondkar and Astad Kale. | या कारणामुळे बिग बॉस मराठी हाऊसमध्ये झाला पुष्कर जोग, स्मिता गोंदकर आणि आस्ताद काळे यांच्यात वाद

या कारणामुळे बिग बॉस मराठी हाऊसमध्ये झाला पुष्कर जोग, स्मिता गोंदकर आणि आस्ताद काळे यांच्यात वाद

र्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज “खेळ मांडला” हे कार्य रंगणार असून घरातील सदस्यांची दोन गटामध्ये विभागणी करण्यात येणार आहे. काल या टास्कची सुरुवात झाली ज्यामध्ये एक टीम लहान मुलांचे पात्र साकारत होते तर दुसरी टीम खेळण्यांचे पात्र रंगवत होते. बिग बॉस मराठीच्या घरात झालेल्या लहान मुलांना त्यांच्या खेळण्यांसोबत सतत खेळून सतवायचे होते. ज्यामध्ये मेघा आणि रेशममध्ये पुन्हा एकदा वाद रंगला. मेघाने आक्षेप घेतला की, बिग बॉसने नियम आम्हाला बोलावून सांगितलेले नाहीत. या वादामध्येच आस्ताद आज बिग बॉसला अशी विनंती देखील करणार आहे की, यापुढे मेघा बरोबर टास्क देऊ नये. या कार्यामध्ये घरातील काही सदस्यांनी बच्चेकंपनी बनून दंगा घातला. हे चिल्लर पार्टी आणि त्यांचे नखरे खेळणी बनलेल्या सदस्यांना बेहाल करून सोडणार आहेत हे नक्की. हा खेळ आज देखील रंगणार असून काल जे सदस्य खेळणी बनले होते ते आज लहान मुलं बनणार आहेत तर जे काल खेळणी बनले होते ते आज लहान मुलं बनणार आहेत. 
आजच्या खेळात पुष्कर, स्मिता आणि आस्ताद मध्ये चांगलेच भांडण झाल्याचे दिसून येणार आहे. पुष्कर दुसऱ्या टीम वर प्रंचड चिडणार असून तो आरोप देखील करणार आहे की, जाणून बुजून ही टीम एकाच खेळण्याला थकवायचा प्रयत्न करत आहेत. ज्यामुळे आस्ताद आणि पुष्कर मध्ये वाद रंगणार आहे. पुष्करने स्मिता आणि टीम मधील सदस्यांना वारंवार माणुसकी नसल्याचे म्हटल्याने स्मिता पुष्करला धमकी देणार आहे की, पुन्हा असं बोलास तर ‘लाथ मारेन...” ज्यावर पुष्कर आणि स्मिता मध्ये बरीच बाचाबाची होणार आहे. दुसरीकडे मेघा रेशमला कार्यामध्ये “मुकी परी” असे म्हणणार आहे. कारण रेशम मेघाशी बोलत नाहीये. जुई आणि स्मितामध्ये देखील टास्क करत असताना वादावादी झाल्याचे बघायला मिळणार आहे.
आता ही भांडणं कोणत्या टोकाला जातील? कोणती टीम विजयी ठरेल? आज बनलेले चिल्लर पार्टी आणि त्यांचे नखरे खेळणी बनलेल्या सदस्यांना किती बेहाल करून सोडणार आहेत हे प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. 

Also Read : बिग बॉसच्या घरातून राजेश शृंगारपुरे बाहेर पडल्यामुळे रेशम टिपणीसची झाली अशी अवस्था

Web Title: Due to this reason Big Boss was in Marathi House, Pushkar Jog, Smita Gondkar and Astad Kale.