​दलजीत कौरला घटस्फोट दिल्यानंतर शालीन भनोट करत आहे कोणाला डेट?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2017 10:11 AM2017-03-22T10:11:29+5:302017-03-22T15:41:29+5:30

दलजीत कौर आणि शालीन भनोट ही छोट्या पडद्यावरची एक प्रसिद्ध जोडी मानली जाते. त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडते. ...

Daljeet Kaur is divorcing after divorce, who is dating? | ​दलजीत कौरला घटस्फोट दिल्यानंतर शालीन भनोट करत आहे कोणाला डेट?

​दलजीत कौरला घटस्फोट दिल्यानंतर शालीन भनोट करत आहे कोणाला डेट?

googlenewsNext
जीत कौर आणि शालीन भनोट ही छोट्या पडद्यावरची एक प्रसिद्ध जोडी मानली जाते. त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडते. त्या दोघांनी नच बलिये या कार्यक्रमात भाग घेतला होता आणि याचे विजेतेपददेखील मिळवले होते. पण काही महिन्यांपूर्वी शालीन छळ करत असल्याचा दलजीतने त्याच्यावर आरोप केला होता. तसेच शालीनने हुंड्याची मागणी केली असल्याचेही तिने म्हटले होते. यावरून त्या दोघांमध्ये प्रचंड वाद झाले होते. त्यानंतर या दोघांनी नुकताच घटस्फोट घेतला. त्या दोघांना एक मुलगादेखील आहे.
दलजीत आणि शालीन गेल्या कित्येक दिवसांपूर्वी वेगळे झाले आहेत. आता दलजीत आयुष्यातून गेल्यानंतर शालीनच्या आयुष्यात दलजीतची जागा दुसरी कोणतरी घेतली असून त्याबद्दल शालीननेदेखील कबुली दिली आहे. 
शालीन सध्या शेर ए पंजाब या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. तो कोणाला तरी डेट करत असल्याचे त्याने नुकतेच म्हटले आहे. तो सांगतो, "मी कोणाला तरी डेट करत असल्याचे खरे आहे. पण मी कोणत्याही मुलीला डेट करत असून सध्या माझ्या मुलासोबत डेटिंग करतोय. मी माझा जास्तीत जास्त वेळ सध्या त्याच्यासोबत घालवत आहे. माझा मुलगा जयदन याला भेटल्यानंतर मला एक वेगळेच समाधान मिळते. मी त्याच्यासोबत खेळतो. तो असताना मी एखादा लहान मुलगाच बनतो. दलजीत आणि माझ्यात आजही चांगले संबंध असून आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. आज घटस्फोट झाल्यानंतरही आमच्यात कटुता नाहीये, तसेच आमच्या एकमेकांच्या मनात एकमेकांशीविषयी काही वाईट विचार नाहीयेत. आमच्या घटस्फोटाचा आमच्या मुलावर परिणाम होणार नाही याची आम्ही दोघेही नेहमी काळजी घेतो."

Web Title: Daljeet Kaur is divorcing after divorce, who is dating?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.