Confirm Bigg Boss 10 winner: मनवीर गुर्जरची ‘खतरों के खिलाड़ी-8’ वा सिझनमध्ये एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2017 11:10 AM2017-03-20T11:10:03+5:302017-03-20T17:13:45+5:30

बिग बॉसचा 10 वा सिझन जिंकल्यानंतर आता मनवीर गुजर आता ‘खतरों के खिलाड़ी-8’ वा सिझन गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.येत्या ...

Confirm Bigg Boss 10 winner: Manavir Gurjar's entry into the 'threats player-8' or Season | Confirm Bigg Boss 10 winner: मनवीर गुर्जरची ‘खतरों के खिलाड़ी-8’ वा सिझनमध्ये एंट्री

Confirm Bigg Boss 10 winner: मनवीर गुर्जरची ‘खतरों के खिलाड़ी-8’ वा सिझनमध्ये एंट्री

googlenewsNext
ग बॉसचा 10 वा सिझन जिंकल्यानंतर आता मनवीर गुजर आता ‘खतरों के खिलाड़ी-8’ वा सिझन गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.येत्या 28 तारखेला मनवीर 'खतरों के खिलाडी' या शोसाठी परदेशात जाणार आहे.या सिझनचे शूटिंग हे स्पेन येथे होणार असून शोमध्ये मोठ्या आव्हानावर मात करण्यासाठी बिग बॉस या शोप्रमाणेच मनवीरने खूप तयारी केली आहे.विशेष म्हणजे लवकरच सुरु होणा-या नच बलिये 8 व्या भागात नितीभा कौरसह सहभागी होण्यासाठी एक वेळा नाहीतर चक्क दोन वेळा ऑफर देण्यात आली होती. मात्र मनवीरला डान्सिंग रिअॅलिटी शो आवडत नाही.डान्स करताना मला पाहणे रसिकांना आवडणार नाही.या कारणामुळे त्याने 'नच बलिये 8' व्या सिझनमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता. बिग बॉसच्या 10 व्या पर्वात मनवीर गुरजरने खूप कठीण स्टंट करत स्वत:ला सिध्द केले होते.तो त्याच्या कौशल्याने रसिकांना त्याने तुफान मनोरंजन केले होते. त्यामुळे मनवीरच सगळ्यांचा फेव्हरेट कंटेस्टंट ठरला होता. रसिकांच्या आवडीमुळेच मनवीर बिग बॉस 10 पर्वाचा विजेता ठरला होता. त्याची लोकप्रियता बघता आता तो ‘खतरों के खिलाड़ी-8’ वा सिझन गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.मनवीर व्यतिरिक्त मन्नु पंजाबी आणि रोहन मेहरा या दोघांनाही या शोमध्ये सहभागी होण्यासाठी विचारणा करण्यात आली असल्याचे कळतंय.मात्र याविषयी कंन्फर्म माहिती हाती आलेली नसून तुर्तास येणा-या काळात मनवीर काय कमाल करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Web Title: Confirm Bigg Boss 10 winner: Manavir Gurjar's entry into the 'threats player-8' or Season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.