क्लिंटन सेरेहो बॅण्ड यांनी सादर केले त्यांचे नवीन गाणे 'लफझो का काफिला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 14:06 IST2017-12-19T08:35:57+5:302017-12-19T14:06:07+5:30

क्लिंटन सेरेहो बॅण्ड आपले 'लफझो का काफिला’ हे नवे गाणे टेड टॉक इंडियाच्या या प्रसिध्द शो मध्ये सादर केले ...

Clinton Serero Band presented his new song "Luffjo Kaafila" | क्लिंटन सेरेहो बॅण्ड यांनी सादर केले त्यांचे नवीन गाणे 'लफझो का काफिला'

क्लिंटन सेरेहो बॅण्ड यांनी सादर केले त्यांचे नवीन गाणे 'लफझो का काफिला'

लिंटन सेरेहो बॅण्ड आपले 'लफझो का काफिला’ हे नवे गाणे टेड टॉक इंडियाच्या या प्रसिध्द शो मध्ये सादर केले . या गाण्याचे बोल खूपच सुंदर आहेत व आजच्या युवकांना प्रेरणादायी ठरेल असे हे गाणे आहे. या गाण्यात शब्दांचे महत्त्व सांगितले असून शब्दांचा आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होतो हे देखील व्यक्त केले आहे . 

क्लिंटन सेरेहो बँडमध्ये क्लिंटन सोबतच गायिका बियांका गोम्स व सुदीप जयपूरवाले यांचा या बँडमध्ये सहभाग आहे. कोणत्याही कार्यक्रमाचा उत्साह दुप्पट करण्याची क्षमता त्यांच्या गाण्यात आहे. सी सी बी या बॅण्ड ने देशभरातील सर्वोत्कृष्ट संगीतकारांन सोबत देशातच नाहितर जागतिक स्तरावर देखील सर्वठिकाणी गाण्याचे शो केले आहेत आणि कोक स्टुडिओ, सूफी रॉक आणि फ्यूजन प्लस बॉलीवूड डान्स हिट आणि मॅशअप्स या कार्यक्रमांचा देखील समावेश आहे. टेड टॉक इंडियाचा कालचा एपिसोड ‘शब्दांचे महत्त्व’ या विषया संदर्भात होता .जावेद अख्तर, गुरमहर कौर, दीपक रमोला, सुपरस्टार शाहरुख खान यांच्या सारखे मान्यवर उपस्थित होते. 

सुप्रसिद्ध संगीतकार क्लिंटन सेरेहो म्हणाले की,”त्यांचे नवीन गाणे शब्दांच्या सामर्थ्याचे प्रतिबिंबित करते आणि हे गीत सिध्दांत कौशल्य यांनी लिहिलेली आहे. ’लफझो का काफिला' हे गाणे शब्दांचे महत्व सांगते, शब्दांची ताकद पटवून देते आणि युवकांना प्रेरित करते. “गेल्या सोळा वर्षांपासून मुंबईत क्लिंटन संगीत क्षेत्रात काम करत आहे. सेरेहो हे विविध संगीत पुरस्काराचे विजेते आहेत व ते संगीतकार व निर्माते, जाहिरातदार या क्षेत्रात देखील कार्यरत आहेत. कोक स्टुडिओ २ मुळे सी सी बी हा बॅण्ड युवकांमध्ये फार प्रसिद्ध आहे. मदारी, मौजे नैना, पिंजरा, इत्यादी संगीतामुळे सगळे त्यांच्या संगीताचे चाहते आहेत.

Web Title: Clinton Serero Band presented his new song "Luffjo Kaafila"