Bigg Boss Marathi 5: कोण होणार विजेता? ट्रॉफीसह मिळणार इलेक्ट्रिक स्कूटर, ज्वेलरी अन् 'इतके' लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 18:15 IST2024-10-06T18:15:20+5:302024-10-06T18:15:48+5:30
अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी हे सदस्य बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फायनलिस्ट आहेत. यापैकी कोण बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

Bigg Boss Marathi 5: कोण होणार विजेता? ट्रॉफीसह मिळणार इलेक्ट्रिक स्कूटर, ज्वेलरी अन् 'इतके' लाख रुपये
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. अवघ्या काही वेळातच बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पर्वाचा विजेता चाहत्यांना मिळणार आहे. अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी हे सदस्य बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फायनलिस्ट आहेत. यापैकी कोण बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.
बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनच्या विजेत्याला खास थीम असलेली ट्रॉफी मिळणार आहे. 'बिग बॉस मराठी ५'चा लोगो असलेला डोळा आणि पाठीमागे यंदाची थीम असलेलं चक्रव्यूह अशी यंदाच्या पर्वाची ट्रॉफी आहे. या ट्रॉफीबरोबरच विजेत्याला काही रोख रक्कमही देण्यात येणार आहे. बिग बॉस मराठी ५ च्या विजेत्याला आधी २५ लाख रुपये देण्यात येणार होते. पण, टास्कमध्ये सदस्यांना यातली काही रक्कम गमवावी लागली. त्यामुळे यंदा बिग बॉस मराठीच्या विजेत्याला १४.६ लाख रुपये मिळणार आहेत.
ट्रॉफी आणि रोख रक्कमबरोबरच इलेक्ट्रिक स्कूटर आणि आकर्षक ज्वेलरीही विजेत्याला मिळणार आहे. आता 'बिग बॉस मराठी ५' ची ट्रॉफी कोण उचलणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
'बिग बॉस मराठी ५'चे स्पर्धक
वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण