अंकिता-कुणालची परदेशवारी! लग्नाच्या ३ महिन्यानंतर 'या' देशात गेले फिरायला, शेअर केला खास व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 16:37 IST2025-05-20T16:31:24+5:302025-05-20T16:37:58+5:30
अंकिता-कुणालचा सफरनामा! शेअर केला खास व्हिडीओ

अंकिता-कुणालची परदेशवारी! लग्नाच्या ३ महिन्यानंतर 'या' देशात गेले फिरायला, शेअर केला खास व्हिडीओ
Ankita Walwalkar: 'कोकण हार्टेड' गर्ल नावाने प्रसिद्ध असलेली सोशल मीडिया स्टार अंकिता प्रभू वालावलकर (Ankita Walwalkar) 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात सहभागी होऊन महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. या कार्यक्रमानंतर अंकिताच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. दरम्यान, अंकिताने अगदी काही महिन्यापूर्वीच तिचा बॉयफ्रेंड कुणाल भगतशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. तिच्या लग्नाला मराठी मनोरंजनविश्वातील कलाकारांसह अनेक सेलिब्रिटी मंडळींनी हजेरी लावली. त्यात आता लग्नाच्या ३ महिन्यानंतर हे अंकिता तिच्या नवऱ्यासह पहिल्यांदाच परदेशात निघाली आहे. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अंकिता वालावलकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्याद्वारे तिच्या आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांसोबत शेअर करते. नुकताच कोकण हार्टेज गर्लने तिच्या पहिल्या इंटरनॅशनल टूरचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आम्हा दोघांची पहिलीच इंटरनॅशनल टूर आणि बऱ्याच नवीन गोष्टींची सुरुवात... असं लक्षवेधी कॅप्शन अंकिताने या पोस्टला दिलं आहे. त्याचबरोबर तिने आणखी एक खास व्हिडीओ शेअर करुन त्यांच्या परदेशवारीची खास झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अंकिता-कुणालच्या या व्हिडीओवर मराठी कलाकारांसह नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
'बिग बॉस मराठी ५'मध्ये अंकिताने बॉयफ्रेंडबद्दल सर्वांना सांगितलं होतं. अखेर 'बिग बॉस मराठी ५'मधून बाहेर आल्यावर अंकिताने कुणालबद्दल खुलासा केला. कुणाल हा पेशाने गायक-संगीतकार आहे.अंकिता बिग बॉसनंतर तिच्या व्यवसायामध्ये लक्ष देत आहे.