Bigg Boss Marathi 3: बिग बॉसमधील स्पर्धकाला हुशारीने खेळण्यासाठी आठवड्याला मिळते एवढे मानधन, पराग कान्हेरेने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 18:03 IST2021-10-16T18:02:50+5:302021-10-16T18:03:45+5:30

Bigg Boss Marathi 3: पराग कान्हेरेने बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभाग दर्शवला होता.

Bigg Boss Marathi 3: Bigg Boss contestant gets weekly honorarium for clever play, reveals Parag Kanhere | Bigg Boss Marathi 3: बिग बॉसमधील स्पर्धकाला हुशारीने खेळण्यासाठी आठवड्याला मिळते एवढे मानधन, पराग कान्हेरेने केला खुलासा

Bigg Boss Marathi 3: बिग बॉसमधील स्पर्धकाला हुशारीने खेळण्यासाठी आठवड्याला मिळते एवढे मानधन, पराग कान्हेरेने केला खुलासा

बिग बॉस मराठीचा तिसरा सीझन रंजक वळणावर आला आहे. या सीझनमधील स्पर्धक गायत्री, जय , मीरा आणि स्नेहा यांना प्रेक्षकांनी सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केलेले पाहायला मिळते. मात्र या स्पर्धकांना हुशारीने खेळण्यासाठीच बिग बॉसचे निर्माते खूप चांगले मानधन देत असते हे नुकतेच समोर आले आहे.(Bigg Boss Marathi 3)

बिग बॉसच्या घरात तुम्ही हुशारीने खेळलात तरच तुम्ही शेवटपर्यंत बाजी मारणार हे त्रिकाल सत्य असले तरी प्रत्येक आठवड्यात या स्पर्धकांना त्यांचा खेळ खेळण्यासाठी भलीमोठी रक्कम मिळत असते.
बिग बॉसच्या सीझन २ चा स्पर्धक पराग कान्हेरे याने नुकतेच या मानधनाबाबत एक खुलासा केला आहे. त्याने म्हटले की, ‘प्रत्येक स्पर्धकाला हुशारीने खेळण्यासाठी बिग बॉस दर आठवड्याला सुमारे लाख रुपये देते’ असे म्हणून त्याने बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनच्या स्पर्धकांवर नाराजी दर्शवत म्हटले की, ‘एवढे मानधन घेऊनही यास स्पर्धकांना त्याची किंमत नाही’


पराग कान्हेरेच्या म्हणण्यानुसार हा खेळण्यासाठी बिग बॉसचा प्रत्येक स्पर्धक आठवड्याला लाख रुपये कमावतो. परागच्या या खुलाशावर एकाने अशी प्रतिक्रिया दिली होती की ,‘हे म्हणजे लोका सांगे ….झाले! तू तरी कुठे संयम ठेवलास?..तू संयम सोडलास आणि बिग बॉस २ मध्ये जी काही थोडी मजा होती तुझ्यामुळे तिला मुकलो आम्ही!..जाऊदे.’ चाहत्यांच्या या प्रतिक्रियेवर स्वतः परागने खेद व्यक्त करत म्हटले की, अगदी खरंय… मी डीसअपॉइंट केले माझ्या फॉलोअर्सना…आणि त्याची खंत नेहमी राहणार…
पराग कान्हेरेने बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभाग दर्शवला होता मात्र एका टास्कदरम्यान त्याला त्रास होऊ लागला म्हणून त्याच्याकडून स्पर्धकांवर हात उचलला गेला आणि त्याला बॉसचे नियम मोडले म्हणून घरातून तडकाफडकी बाहेर काढले.

Web Title: Bigg Boss Marathi 3: Bigg Boss contestant gets weekly honorarium for clever play, reveals Parag Kanhere