Bigg Boss Marathi 3: तुटलेल्या नात्याला नवी पालवी? अविष्कारने रडत रडत स्रेहाला मारली मिठी, म्हणाला सॉरी...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 17:43 IST2021-10-05T17:38:20+5:302021-10-05T17:43:33+5:30

Bigg Boss Marathi 3 : अविष्कार का झाला इतका भावुक? बिग बॉसच्या घरातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

bigg boss marathi 3 avishkar darvekar hugs sneha wagh | Bigg Boss Marathi 3: तुटलेल्या नात्याला नवी पालवी? अविष्कारने रडत रडत स्रेहाला मारली मिठी, म्हणाला सॉरी...!

Bigg Boss Marathi 3: तुटलेल्या नात्याला नवी पालवी? अविष्कारने रडत रडत स्रेहाला मारली मिठी, म्हणाला सॉरी...!

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी अविष्कार जय दुधाणे सोबत त्याच्या व स्नेहाच्या घटस्फोटाबद्दल बोलताना दिसला होता. ‘स्नेहासोबतचा घटस्फोट त्याच्या आयुष्यातली सगळ्यात वाईट घटना होती. या घटस्फोटानंतर माझा कबीर सिंग झाला होता. मी खूप दारू प्यायला लागला होतो,’ असं त्याने म्हटल

‘बिग बॉस’च्या घरात काय घडेल याचा नेम नाही. आता ‘बिग बॉस मराठी 3’चे (Bigg Boss Marathi 3) उदाहरण घ्या. एक घटस्फोटित जोडपं या सीझनमध्ये दिसतंय आणि आता या नात्यानं दुरावलेल्या जोडप्यात कदाचित नवं नातं तयार होऊ पाहतंय. होय, आम्ही बोलतोय ते या सीझनमध्ये सहभागी झालेले अभिनेत्री स्रेहा वाघ (Sneha Wagh) आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती अविष्कार दारव्हेकर (Avishkar Darvekar )या दोघांबद्दल.
बिग बॉस मराठी 3’चा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यात अविष्कार रडत रडत एक्स-वाईफ स्रेहा वाघला कडकडून मिठी मारताना दिसतोय. कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टा अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘एकट वाटून घेऊ नकोस, आपण सर्व एकत्र आहोत’, असं सुरेखा कुडची अविष्कारला म्हणतात. त्यावर विशाल अविष्कारला  एकदा तिकडे बघ म्हणत, स्रेहाकडे इशारा करतो. यावर अविष्कार भावुक होतो. त्याला रडू कोसळतं आणि तो स्रेहाजवळ जात तिला मिठी मारतो.

वयाच्या उणापु-या 19 व्या वर्षी स्रेहाने अविष्कारशी लग्नगाठ बांधली होती.  मात्र काही वर्षातच ते विभक्त झाले. स्नेहाने अविष्कारवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. 


 
अविष्कार का झाला इतका भावुक?

बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकर यांनी अविष्कारला सर्वात कमकुवत खेळाडू म्हणून  कानपिचक्या दिल्या. तसेच पाच लाख रुपये घेऊन खेळ सोडण्याची ऑफरही दिली. विशेष म्हणजे अविष्कारने ती ऑफर स्वीकारलीही. पण यामुळे  महेश मांजरेकर त्याच्यावर चांगलेच भडकले. या सर्व प्रकारानंतर अविष्कार भावूक होऊन रडायला लागला.  सुरेखा कुडची, विशाल निकम यांनी त्याची समजूत काढली. त्यानंतर अविष्कारनेही स्नेहाला मिठी मारत तिला सॉरी म्हटलं. 
काही दिवसांपूर्वी अविष्कार जय दुधाणे सोबत त्याच्या व स्नेहाच्या घटस्फोटाबद्दल बोलताना दिसला होता. ‘स्नेहासोबतचा घटस्फोट त्याच्या आयुष्यातली सगळ्यात वाईट घटना होती. या घटस्फोटानंतर माझा कबीर सिंग झाला होता. मी खूप दारू प्यायला लागला होतो,’ असं त्याने म्हटलं होतं. त्यावर ‘स्नेहा या घरातली सगळ्यात जास्त जबाबदार, शांत आणि समजूतदार व्यक्ती वाटते, असं जय म्हणाला होता. पण, समजूतदार नाही ती प्रचंड तापट आहे. तुला वेळ आल्यावर कळेलच, असे अविष्कार म्हणाला होता.

Web Title: bigg boss marathi 3 avishkar darvekar hugs sneha wagh