Bigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 19:09 IST2019-08-20T19:09:17+5:302019-08-20T19:09:44+5:30
वीणाने यशस्वीरीत्या स्पर्धेच्या अंतिम दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केला आहे.

Bigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत
बिग बॉस मराठी सीझन २ च्या विजेतेपदाची प्रबळ दावेदार समजली जाणारी स्पर्धक वीणा जगतापच्या चाहत्यांसाठी एक मोठी खुश खबर आहे. आपल्या सर्वांच्या लाडक्या राधाच्या म्हणजेच वीणाच्या स्टायलिंगची सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा होताना पाहायला मिळत आहे.
वीणाने बिग बॉसच्या घरात आतापर्यंत घातलेल्या प्रत्येक पेहरावाचे तरुणाईमध्ये आकर्षण आहे. खास करून ती घालत असलेल्या नाईट सूट्सची क्रेझ युथमध्ये वाढली आहे. तिचे नाईट सुट्स लोकांना आवडत असल्याचे मेसेजेस आणि कमेंट्स तिला येत आहेत. थोडक्यात काय तर, वीणाची वाढती प्रसिद्धी यांमधून दिसून येत आहे
वीणाने यशस्वीरीत्या स्पर्धेच्या अंतिम दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केला असून, ती घालत असलेल्या ज्वेलरी आणि कपड्यांची देखील चर्चा सोशल नेटवर्किंग साईटवर होत आहे. तिचे वाढते फॉलोअर्स आणि फॅशन ट्रेंड्स लक्षात घेता तिला अनेक ब्रॅण्ड आणि स्पॉन्सरदेखील चालून येत आहे. इतकेच नव्हे तर, तिने घातलेल्या कानातल्यांनादेखील आता स्पॉन्सर मिळू लागले आहेत.
अगदी सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत वीणा जे काही घालते, त्याचे अनुकरण बाहेर त्वरित होताना दिसून येत आहे.
बिग बॉस मराठीच्या घरात आज पुन्हा जुन्या आठवणी, जुने सदस्य, ती मैत्री, त्या गप्पा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. कारण, आज घरामध्ये सिझन 2 चे घराबाहेर पडलेले काही सदस्य येणार आहेत.
हे सदस्य घरात आल्यावर कोणते सल्ले देतील ? हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.