Bigg Boss 19: रात्रभर गॅस चालूच राहिला, मोठा स्फोट होऊन १६ स्पर्धकांचा जीव गेला असता, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 13:42 IST2025-09-08T13:36:46+5:302025-09-08T13:42:59+5:30

तर आज बिग बॉसच्या घराचा भडका उडून मोठी घटना घडली असती. काय झालं नेमकं? जाणून घ्या

bigg boss 19 Contestant's Mistake Causes Gas Leak, Major Accident happened salman khan | Bigg Boss 19: रात्रभर गॅस चालूच राहिला, मोठा स्फोट होऊन १६ स्पर्धकांचा जीव गेला असता, पण...

Bigg Boss 19: रात्रभर गॅस चालूच राहिला, मोठा स्फोट होऊन १६ स्पर्धकांचा जीव गेला असता, पण...

लोकप्रिय रिॲलिटी शो 'बिग बॉस १९' विषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. 'बिग बॉस १९'च्या घरात एक मोठा अपघात घडला असता. एका स्पर्धकाच्या निष्काळजीपणामुळे घरामध्ये गॅस गळती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे सर्व स्पर्धकांचे प्राण धोक्यात आले होते. सुदैवाने, मोठा अपघात टळला आणि परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणली गेली. काय घडलं नेमकं?

नेमके प्रकरण काय?

'बिग बॉस' इनसाइडर्सच्या माहितीनुसार, वीकेंडच्या वारनंतर एका स्पर्धकाने किचनमधील गॅस वापरला आणि तो चालूच ठेवला. यामुळे रात्रभर गॅसची गळती होत राहिली आणि संपूर्ण घरात गॅसचा वास पसरला. ही बाब घराचा कॅप्टन बशीर अलीच्या लक्षात येताच तो चांगलाच संतापला. त्याने सर्व स्पर्धकांना जाब विचारला आणि त्यांच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली. एका स्पर्धकाच्या या चुकीमुळे घरात मोठा स्फोट होऊ शकला असता, ज्यामुळे घरातील सर्व सदस्यांच्या जीवावर बेतणारा प्रसंग घडला असता. 


या निष्काळजीपणामुळे संपूर्ण 'बिग बॉस'चा सेटही जळून खाक होण्याची भीती होती. मात्र, वेळीच ही बाब लक्षात आल्याने मोठा अपघात टळला. 'बिग बॉस' च्या घरात याआधीही अशी घटना घडली होती. 'बिग बॉस १५'च्या सेटवरही आग लागली होती, परंतु टीमने वेळीच पावले उचलून आग विझवली होती. शो संपल्यानंतरही एकदा सेटवर आग लागली होती, ज्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी चार अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावण्यात आल्या होत्या.

'बिग बॉस १९' च्या घरातील अपडेटबद्दल सांगायचं तर दुसऱ्या 'वीकेंड का वार' मध्ये एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. अभिनेत्री शहनाज गिलचा भाऊ शहबाज बदेशा याने घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री केली आहे. या आठवड्यात घरातून कोणालाही बाहेर काढण्यात आलेले नाही. आता तिसऱ्या आठवड्यात कोणते ट्विस्ट असणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

Web Title: bigg boss 19 Contestant's Mistake Causes Gas Leak, Major Accident happened salman khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.