'भाभीजी घरपर हैं' मालिकेचा या पुरस्काराने झाला गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 11:07 IST2018-05-04T05:37:08+5:302018-05-04T11:07:08+5:30

'भाभीजी घरपर हैं' ही लोकप्रिय मालिका अत्यंत धमाल आणि हास्यविनोदाच्या संगतीने अत्यंत यशस्वी वाटचाल करत असून प्रेक्षकांचे मनोरंजन करत ...

'Bhabhiji is at home', the award has been honored with the prize | 'भाभीजी घरपर हैं' मालिकेचा या पुरस्काराने झाला गौरव

'भाभीजी घरपर हैं' मालिकेचा या पुरस्काराने झाला गौरव

'
;भाभीजी घरपर हैं' ही लोकप्रिय मालिका अत्यंत धमाल आणि हास्यविनोदाच्या संगतीने अत्यंत यशस्वी वाटचाल करत असून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.या अत्यंत विनोदी कार्यक्रमाने सर्व वयोगटातील लोकांच्या मनात एक विशेष स्थान मिळवले असून त्याचे कारण त्यांची धमाल आणि कौटुंबिक पार्श्वभूमी आहे.या कार्यक्रमाने फक्त लोकांच्या मनातच जागा मिळवलेली नाही तर त्याने अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन अवॉर्डसमध्ये सर्वोत्तम मालिकेचा पुरस्कार मिळवला आहे.या कार्यक्रमाला सर्वोत्तम मालिका पुरस्कार मिळालाच. शिवाय, मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका दिमाखदार पुरस्कार सोहळ्यात यातील अनेक व्यक्तिरेखांना पुरस्कार देण्यात आले.

Also Read:'भाभीजी घर पर है' मालिकेतील या कलाकाराला मिळते सगळ्यात जास्त मानधन

अभिनेते रोहिताश गौड (तिवारीजी) आणि शुभांगी अत्रे (अंगूरी) यांनाही अनुक्रमे आपल्या उत्तम कामगिरीसाठी सर्वोत्तम अभिनेता आणि सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्काराने गौरवण्यात आले. श्री. शशांक बाली यांना सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला असून मनोज संतोषी यांना सर्वोत्तम लेखकाचा पुरस्कार देऊन या पुरस्कारांच्या यादीत भर घालण्यात आली आहे.टीव्हीची लाडकी भाभी (अंगूरी) हा पुरस्कार स्वीकारताना म्हणाली की, मला हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारताना खूप अभिमान वाटत आहे. हे काही असे क्षण आहेत जेव्हा तुमची मेहनत उपयोगी पडली असे तुम्हाला वाटते. आमच्या प्रेक्षकांचे प्रेम आणि सहकार्य यांच्याशिवाय आम्ही काहीही करू शकलो नसतो, त्यामुळे हा पुरस्कार त्यांच्यासाठी आहे. अंगूरी भाभी ही एक लाडकी व्यक्तिरेखा ठरली आहे आणि त्यामुळे मला नेहमीच माझ्याकडून जे अपेक्षित आहे त्यापेक्षा जास्त देण्याची प्रेरणा मिळते. मला एक कलाप्रकार म्हणून विनोद नेहमीच आवडतो आणि इतक्या चांगल्या कलाकारांसोबत काम करणे ही आनंदाची गोष्ट आहे.रोहिताश पुढे म्हणाले की, या एकाच रात्रीत अनेक पुरस्कार मिळवणाऱ्या कार्यक्रमाचा भाग होताना खूप आनंद झाला आहे. या कार्यक्रमाला आणि माझ्या व्यक्तिरेखेला मिळालेले प्रेम आणि कौतुक पाहून मला उचंबळून आले आहे. पुढील अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन मी करत राहीन अशी मला आशा आहे.

Web Title: 'Bhabhiji is at home', the award has been honored with the prize