बरखा बनली शेफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2016 13:31 IST2016-10-03T08:01:13+5:302016-10-03T13:31:13+5:30

नामकरण या मालिकेच्या सेटवर नुकतेच एक दृश्य चित्रीकरण करण्यात आले. या दृश्यात बरखा बिष्टला डाळ ढोकळी हा गुजराती पदार्थ ...

Barkha Chested Chef | बरखा बनली शेफ

बरखा बनली शेफ

मकरण या मालिकेच्या सेटवर नुकतेच एक दृश्य चित्रीकरण करण्यात आले. या दृश्यात बरखा बिष्टला डाळ ढोकळी हा गुजराती पदार्थ बनवायचा होता. त्यामुळे या दृश्याचे चित्रीकरण करण्यास ती खूपच उत्सुक होती. या दृश्यात तिने कोणाचीही मदत न घेता स्वतः डाळ ढोकळी बनवायची ठरवली. एवढेच नव्हे तर तिने दृश्याचे चित्रीकरण झाल्यानंतर ही डाळ ढोकळी सगळ्यांना खायलादेखील दिली. तिची ही डाळ ढोकळी खूपच छान झाल्याचे मालिकेच्या टीममधील सगळ्यांचेच म्हणणे होते. याविषयी बरखा सांगते, "जेवण बनवण्याची वेळ खरे तर माझ्यावर खूपच कमी वेळा येते. पण मला स्वतःला नववनीन पदार्थ बनवायला खूप आवडतात. मला जेव्हा वेळ असेल तेव्हा मी झटपट होणारे पदार्थ करते. माझा नवरा आणि माझी मुले त्यावर अक्षरशः तुटून पडतात." 

Web Title: Barkha Chested Chef