'तारक मेहता...'मधील 'बबिता' अजूनही आहे सिंगल; अभिनेत्रीने लग्न का केलं नाही? हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 13:51 IST2025-03-11T13:49:02+5:302025-03-11T13:51:54+5:30

'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतील अभिनेत्री अजून विवाहबंधनात का अडकली नाही? कारण आलं समोर

babita from tarak mehta actress munmun dutta why not married at the age of 37 | 'तारक मेहता...'मधील 'बबिता' अजूनही आहे सिंगल; अभिनेत्रीने लग्न का केलं नाही? हे आहे कारण

'तारक मेहता...'मधील 'बबिता' अजूनही आहे सिंगल; अभिनेत्रीने लग्न का केलं नाही? हे आहे कारण

'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिका (tarak mehta ka ooltah chashmah) सध्या चांगलीच चर्चेत आहे. मालिका गेली १५ हून जास्त वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतील जेठालाल, दयाबेन, टप्पूनंतर असंच एक गाजलेलं कॅरेक्टर म्हणजे बबिता. अभिनेत्री मुनमुन दत्तानेबबिताची भूमिका साकारली आहे. 'तारक मेहता का उलटा चष्मा'मध्ये बबिताचं लग्न अय्यरसोबत झालेलं दिसतं. पण रिअल लाईफमध्ये ३७ वर्षीय बबिता अजून सिंगल आहे. काय आहे यामागील कारण?

म्हणून बबिताने अजून लग्न नाही केलं

'तारक मेहता का उलटा चष्मा'मधील मुनमुनने साकारलेली भूमिका हिट झाली. त्यामुळेच मुनमुनचं फॅन फॉलोईंगही प्रचंड आहे. रिपोर्ट्सनुसार मुनमुनने आजवर लग्न का केलं नाही, याचं कारण समोर आलंय. DNA ने दिलेल्या रिपोर्टनुसार मुनमुनला तिच्या पूर्वायुष्यातील रिलेशनशीपमध्ये खूप त्रास सहन करावा लागला होता. याशिवाय मुनमुनचं नाव अरमान कोहलीसोबत जोडलं गेलं होतं. परंतु अरमानच्या तापट स्वभावामुळे या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. त्यामुळे त्यांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला.

टप्पूसोबत जोडलं गेलं नाव

काही महिन्यांपूर्वी 'तारक मेहता का उलटा चष्मा'मध्ये 'टप्पू'च्या भूमिकेत दिसलेल्या राज अनाडकटसोबत मुनमुनचं नाव जोडलं गेलं होतं. परंतु अभिनेत्रीने आणि अभिनेत्याने या अफवा धुडकावून लावल्या. एकूणच पूर्वायुष्यातील वाईट अनुभवांमुळे ३७ वर्षीय मुनमुन सिंगल असून ती आनंदी आहे. मुनमुन अनेकदा तिच्या आईसोबत इव्हेंटला किंवा शॉपिंग करताना दिसून येते. मुनमुनचे सोशल मीडियावर तब्बल ८ मिलियन फॉलोवर्स आहेत. 'तारक मेहता का उलटा चष्मा'मध्ये मुनमुन आजही बबिताच्या भूमिकेत प्रेक्षकांचं मन जिंकत आहे.
 

Web Title: babita from tarak mehta actress munmun dutta why not married at the age of 37

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.