पूजा बॅनर्जी बनली आशिष चौधरीची पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2017 14:15 IST2017-07-13T08:45:05+5:302017-07-13T14:15:05+5:30

पूजा बॅनर्जीने महादेव या मालिकेत पार्वतीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती. त्यानंतर ती महाभारत ...

Ashish Chaudhary's wife Pooja Banerjee became the wife of Ashish Chaudhary | पूजा बॅनर्जी बनली आशिष चौधरीची पत्नी

पूजा बॅनर्जी बनली आशिष चौधरीची पत्नी

जा बॅनर्जीने महादेव या मालिकेत पार्वतीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती. त्यानंतर ती महाभारत या मालिकेत द्रोपदीच्या भूमिकेत झळकली. पुजाने आतापर्यंत अनेक पौराणिक मालिकांमध्ये काम केले आहे. आता ती प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत आणि वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळणार आहे.
देव आनंद ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. देव आनंद या डिटेक्टिव्हच्या आयुष्यावर ही मालिका असणार आहे. या मालिकेत देव आनंद विविध केसेस सोडवताना आपल्याला दिसणार आहे. अनेक रहस्यांची उकल करणारा देव आनंद प्रेक्षकांना आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. या मालिकेत देव आनंद ही मुख्य भूमिका आशिष चौधरी साकारणार आहे. आशिषने हम परदेसी हो गये या मालिकेत काम केले होते. त्याची ही मालिका प्रचंड गाजली होती. तसेच धमाल या चित्रपटात तो झळकला होता. पूजा बॅनर्जी देव आनंद या मालिकेत देवच्या म्हणजेच आशिषच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. हा पुजाचा छोट्या पडद्यावरचा कमबॅक असणार आहे. याविषयी पूजा सांगते, छोट्या पडद्यापासून दूर राहायचे असे मी ठरवले नव्हते. पण गेल्या काही महिन्यांपासून मी बंगाली चित्रपटात व्यग्र असल्याने मला हिंदी मालिकांसाठी वेळ देता येत नव्हता. सध्याच्या डेली सोपपेक्षा देव आनंद ही मालिका खूपच वेगळी असल्याने मी क्षणाचाही विचार न करता या मालिकेसाठी होकार दिला. मी या मालिकेत महेक ही व्यक्तिरेखा साकारत आहे. मालिका पाहाताना महेक ही अतिशय साधी भोळी असलेली तुम्हाला सुरुवातीला वाटणार आहे. पण काही भागानंतर या व्यक्तिरेखेतील अनेक पैलू उलगडले जाणार आहेत. माझ्या फॅन्सना माझा हा नवा अवतार आवडेल याची मला खात्री आहे.
देव आनंद या मालिकेत प्रेक्षकांना सुमोना चक्रवर्तीदेखील पाहायला मिळणार आहे. या मालिकेत ती देव आनंदच्या असिस्टंटची भूमिका साकारणार असून मीरा असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव असणार आहे. 

Also Read : ​आशिष चौधरीचा देव आनंद या मालिकेद्वारे कमबॅक

Web Title: Ashish Chaudhary's wife Pooja Banerjee became the wife of Ashish Chaudhary