​सुरूची अडारकर बनली अंजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2017 17:12 IST2017-05-05T11:42:32+5:302017-05-05T17:12:32+5:30

का रे दुरावा या कार्यक्रमामुळे सुरूची अडारकरला खऱ्या अथाने लोकप्रियता दिली. या आधी तिने ओळख, एक तास भूताचा यांसारख्या ...

Anjali made an idiot | ​सुरूची अडारकर बनली अंजली

​सुरूची अडारकर बनली अंजली

रे दुरावा या कार्यक्रमामुळे सुरूची अडारकरला खऱ्या अथाने लोकप्रियता दिली. या आधी तिने ओळख, एक तास भूताचा यांसारख्या अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले होते. पण का रे दुरावा या मालिकेत तिने साकारलेली आदिती ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या मालिकेतील तिची आणि सुयश टिळकची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. ही मालिका संपून आता कित्येक महिने झाले आहेत. पण गेल्या काही महिन्यांपासून सुरूचीने छोट्या पडद्यापासून दूर राहाणेच पसंत केले आहे. का रे दुरावा ही मालिका संपल्यानंतर ती स्ट्रॉबेरी या नाटकात झळकली होती. या मालिकेतदेखील तिची जोडी सुयश टिळकसोबत जमली होती. या नाटकाने देखील प्रेक्षकांची चांगलीच वाहवा मिळवली.
आता कित्येक महिन्यांनंतर सुरूची छोट्या पडद्यावर परतत आहे. ती आता प्रेक्षकांना अंजली या मालिकेत अंजली या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत ती डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. आपल्या रुग्णांची मनापासून काळजी घेणारी, कधीही वेळेचा विचार न करणारी अशी ही अंजली आहे. ती नेहमीच आपले कर्तव्य योग्यपणे पार पडते आणि रुग्णांच्या मदतीसाठी तत्पर असते असे आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुरूचीने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही खूपच वेगळी भूमिका आहे. या मालिकेसाठी सध्या ती खूपच उत्सुक आहे. अंजली या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमणार आहे. हर्षदने याआधी दुर्वा या मालिकेत काम केले होते. या मालिकेत त्याने साकारलेली केशव ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेच्या निमित्ताने हर्षद आणि सुरूची ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

Web Title: Anjali made an idiot