'भाबीजी घर पर है'मधील अंगुरी भाभीला झाली दुखापत, डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 19:02 IST2022-07-19T18:46:11+5:302022-07-19T19:02:04+5:30

Shubhangi Atre ‘भाभीजी घर पर है'मधील अंगुरी भाभीला दुखापत झालीय त्यामुळे तिचे चाहते चिंतेत आहेत.

Anguri Bhabhi in 'Bhabiji Ghar Par Hai' gets injured, doctor advises rest | 'भाबीजी घर पर है'मधील अंगुरी भाभीला झाली दुखापत, डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला

'भाबीजी घर पर है'मधील अंगुरी भाभीला झाली दुखापत, डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला

छोट्या पडद्यावर सध्या विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करत आहेत. मालिकांच्या कथानकामधील रंगतदार वळण यामुळे काही मालिका रसिकांच्या मनात घर करुन गेल्या आहेत. अशाच मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘भाभीजी घर पर है'. गेल्या अनेक वर्षापासून ही मालिका रसिकांचे भरघोस मनोरंजनक करत आहे. छोट्या पडद्यावरील रसिकांचं लाडकं पात्र म्हणजे अंगुरी भाभी. मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांना भावली आहे. त्यापैकी रसिकांची लाडकी म्हणजे अंगुरी भाभी साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रेसुद्धा तितकीच लोकप्रिय ठरली आहे. या भूमिकेतून शुभांगी अत्रेने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.

शुभांगीला घरी तिचा हायड्रॉलिक पलंग उचलताना पाठीत स्‍नायूदुखीचा तीव्र त्रास झाला आहे. डॉक्टरांनी तिला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला, तसेच लवकरात लवकर बरे होण्यासाठी आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका 'भाबीजी घर पर है'मधील शुभांगी अत्रे ऊर्फ अंगूरी भाभी म्‍हणाली, ''मला २०१० मध्‍ये गंभीर दुखापत झाली होती आणि आजही मला त्‍या दुखापतीचा त्रास होतो. मी नकळतपणे अवजड वस्‍तू उचलते तेव्‍हा मला पाठीत स्‍नायूदुखीचा त्रास होत मोठी कळ जाते. मी काही दिवसांपूर्वी माझ्या हायड्रॉलिक पलंगाची स्प्रिंग तुटल्‍याचे पाहिल्‍यानंतर तो पलंग उचलण्‍याचा प्रयत्‍न केला. परिणामत: संपूर्ण पलंगाचे वजन माझ्या पाठीवर आले, ज्‍यामुळे मला खूप वेदना झाल्‍या. मी तीन ते चार तासांपर्यंत हलू शकले नाही आणि वेदना असह्य झाल्‍या. त्‍यानंतर मी डॉक्‍टरांकडे गेले, ज्‍यांनी मला तीन दिवस विश्रांती घेण्‍याचा सल्‍ला दिला. त्‍यांनी मला अधिक खबरदारी घेण्‍याचा जड वस्‍तू न उचलण्‍याचा सल्‍ला दिला.'' 


 

Web Title: Anguri Bhabhi in 'Bhabiji Ghar Par Hai' gets injured, doctor advises rest