अक्षयकुमार या रिअ‍ॅलिटी शोमधून छोट्या पडद्यावर परतणार!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2017 21:41 IST2017-05-05T15:15:05+5:302017-05-05T21:41:10+5:30

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याच्यासाठी हे वर्ष खूपच चांगले जात आहे. तब्बल २५ वर्षांनंतर त्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ...

Akshay Kumar will return to the small screen from reality show !! | अक्षयकुमार या रिअ‍ॅलिटी शोमधून छोट्या पडद्यावर परतणार!!

अक्षयकुमार या रिअ‍ॅलिटी शोमधून छोट्या पडद्यावर परतणार!!

लिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याच्यासाठी हे वर्ष खूपच चांगले जात आहे. तब्बल २५ वर्षांनंतर त्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शिवाय यावर्षी त्याचे अनेक चित्रपटही रिलीज होणार असल्याने सध्या अक्षय भलताच खूश आहे. आता आलेल्या माहितीनुसार अक्षय पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतणार असल्याने त्याच्या चाहत्यांना आता अक्षयला घरबसल्या टीव्हीवर बघता येणार आहे. 

होय, ‘खतरों के खिलाडी’ आणि ‘डेअर टू डान्स’ या टीव्ही शोला होस्ट केल्यानंतर अक्षय पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतण्यास तयार आहे. यावेळेस अक्षय पुन्हा एकदा एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये बघावयास मिळणार आहे. या शोचे निर्माता अश्विनी यर्दी असणार आहे. अश्विनीने ‘ओ माय गॉड’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 

मुंबई मिररने दिलेल्या माहितीनुसार, हा शो टॅलेण्ड बेस्ड असणार आहे. ज्यामध्ये अक्षय जजच्या भूमिकेत असेल. सध्या या शोची तयारी सुरू असून, अक्षय आपल्या बिझी शेड्युल्डमधून शूटिंगला वेळ देण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या अश्विनी कलर्स या चॅनेलशी जोडलेली असल्याने हा शोदेखील याच चॅनेलवर दाखविला जाण्याचा शक्यता आहे. 

अक्षयने ‘खतरों के खिलाडी’ या शोला सुरुवातीच्या सीजनमध्ये होस्ट केले होते. त्यानंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी याने पाचव्या आणि सहाव्या सीजनला होस्ट केले. पुढचा सीजनही रोहितच होस्ट करणार आहे. दरम्यान, सध्या अक्षय छोट्या पडद्यावर परतण्यासाठी त्याच्या शेड्युल्डमध्ये ताळमेळ बसविण्याचा प्रयत्न करीत आहे.  

Web Title: Akshay Kumar will return to the small screen from reality show !!