आजोबांच्या हट्टापायी आपल्या तत्त्वांना मुरड घालेल का आसावरी? 'अग्गबाई सूनबाई' मालिकेत मोठा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 12:33 PM2021-07-01T12:33:17+5:302021-07-01T12:39:13+5:30

'अग्गबाई सूनबाई' ही मालिकेत सोहम आणि सुझेनच्या अफेअरबद्दल आसावरीला कळल्यावर आसावरी त्या दोघांनाही घराबाहेर काढते, इतकंच नव्हे तर आसावरी त्या दोघांना ऑफिसमधून देखील काढून टाकते.

Agga Bai Sunbai Marathi Serial Upcoming twist | आजोबांच्या हट्टापायी आपल्या तत्त्वांना मुरड घालेल का आसावरी? 'अग्गबाई सूनबाई' मालिकेत मोठा ट्विस्ट

आजोबांच्या हट्टापायी आपल्या तत्त्वांना मुरड घालेल का आसावरी? 'अग्गबाई सूनबाई' मालिकेत मोठा ट्विस्ट

googlenewsNext


'अग्गबाई सूनबाई' ही मालिका सुरू झाल्यापासून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेतील आसावरी, अभिजीत राजे, शुभ्रा, सोहम आणि आजोबा ही सर्वच पात्रे प्रेक्षकांच्या घरातील एक झाली असून त्यांच्यावर सर्वजण भरभरून प्रेम करत आहेत. या मालिकेच्या नवीन पर्वामध्ये आसावरीने सर्व घराची सूत्र हाती घेतली असून सोहम तिचा राईट हॅन्ड झाला आहे. तर अभिजीत राजे यांनी स्वतःहून सर्व घरची जबाबदारी स्वीकारली.

हि मालिका आता उत्कंष्ठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत प्रेक्षकांनी अनुराग म्हणजेच अभिनेता चिन्मय उदगीरकरची एंट्री झाल्यानंतर अनेक रंजक वळणं मालिकेत पाहायला मिळाले. आधी या मालिकेत शुभ्राचे वेगळे रूप प्रेक्षकांनी पाहिले. आधी शुभ्रा थोडी लाजरी बुजरी होती. सतत बबडूच्या काळजीत असलेली शुभ्रा 'मी करते ते बरोबर की नाही' हा भाव तिच्या मनात असायचा. 

बबडूची जबाबदारी असल्याने ती घरातच होती पण शुभ्राचा आत्मविश्वास आता परत आला तिने डीबीके फूड्स जॉईन केलं .शुभ्राने सोहमला सुद्धा सुझॅनशी संपर्क तोडण्याची ताकीद दिली होती. पण त्याचा फार काही फायदा झाला नाही. शुभ्राची जागा बळकावण्यासाठी सुझॅन प्रयत्न करतेय. सोहमच्या घरी येऊन शुभ्राला घराच्या बाहेर घालवून त्या घरावर राज्य करण्याची स्वप्न सुझॅन पाहतेय. 


दरम्यान सोहम आणि सुझेनच्या अफेअरबद्दल आसावरीला कळल्यावर आसावरी त्या दोघांनाही घराबाहेर काढते, इतकंच नव्हे तर आसावरी त्या दोघांना ऑफिसमधून देखील काढून टाकते. इतकं होऊन सुद्धा सोहमला स्वतःची चूक कळत नाही आहे. सोहम सुझेनच्या घरी राहायला गेल्यावर तिच्या घराची अवस्था बघून परत आपल्या घरी जायला पाहिजे असं ठरवतो. पण आसावरी त्याला घरात घेणं शक्य नाही म्हणून सोहम आता आजोबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून डाव साधणार आहे. आजोबा घरी येतात सोहम बद्दल विचारतात. घरतले सगळे खोट कारण देतात की तो कामासाठी बाहेर गेला आहे. 

पण सोहमला आसावरीने घराबाहेर काढल्याचे आजोबांना बबडूकडून कळतं आणि आजोबांना चक्कर येते. आजोबा आसावरीकडे सोहमला परत घरी आणायचा हट्ट करतात पण शुभ्राला न्याय मिळवून देण्यासाठी आसावरीने हे उचललेलं हे पाऊल आजोबांमुळे मागे घेईल का? आजोबांच्या हट्टापायी आसावरी आपल्या तत्त्वांना मुरड घालेल का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

Web Title: Agga Bai Sunbai Marathi Serial Upcoming twist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.