१८ वर्षांनी मोठ्या व्यक्तीसोबत लग्न करून फसली! घटस्फोटामुळे लेकही दुरावली; प्रसिद्ध अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्याबद्दल वक्तव्य, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 16:12 IST2026-05-08T15:56:17+5:302026-05-08T16:12:35+5:30
कमी वयातच लग्न, १८ वर्षांनी मोठा होता नवरा! घटस्फोटामुळे लेकीसोबतचं नातं बिघडलं, 'त्या' गोष्टीचा अभिनेत्री होतोय पश्चाताप, म्हणाली-“त्या काळात मला…”

१८ वर्षांनी मोठ्या व्यक्तीसोबत लग्न करून फसली! घटस्फोटामुळे लेकही दुरावली; प्रसिद्ध अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्याबद्दल वक्तव्य, म्हणाली...
Tannaz Irani: बॉलिवूडसह छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे तनाज इराणी(Tanaj Irani). तनाज ही कायमच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. आजवर अभिनेत्रीने आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. तनाज इराणीने पहिलं लग्न १९९१ मध्ये आंतरधर्मीय लग्न केलं होतं.मात्र, तिचं हे लग्न फार काळ टिकलं नाही. त्यावेळी अभिनेत्री फक्त २० वर्षांची होती आणि तिचा माजी पती ३७ वर्षांचा होता. दोघांच्या वयात तब्बल १८ वर्षांचं अंतर होतं. सध्या एका मुलाखतीत अभिनेत्री ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.
' Hauterrfly' ला दिलेल्या मुलाखतीत तनाजने लग्न, घटस्फोट आणि मुलांच्या संगोपनाबाबत एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. तसेच मुलीसोबत निर्माण झालेल्या दुराव्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ती म्हणाली, "मला कोण काय म्हणेल याची कधी पर्वा नव्हती. मी नेहमी आत्मविश्वासाने जगले. माझ्या घरातील महिलांनी मला नेहमीच बळ दिलं. माझी आजी आधुनिक कपडे घालायची आणि घरातील पुरुषांनी कधीही महिलांना रोखलं नाही.”
मग ती म्हणाली, “माझे वडील रोज सकाळी आईसाठी चहा बनवायचे, आमच्यासाठी सँडविच तयार करायचे. त्यामुळे महिलांचा आदर करणारे वातावरण मी लहानपणापासून पाहिलं. पण इंडस्ट्रीत आल्यानंतर बाहेरचं वास्तव वेगळं असल्याचं जाणवलं.” असे स्पष्ट मत तिने मांडलं.
घटस्फोटाबद्दल अभिनेत्रीने व्यक्त केल्या भावना...
“मी वयाच्या २० व्या वर्षी माझ्यापेक्षा १८ वर्षांनी मोठ्या पुरुषाशी लग्न केलं होतं. तो खूप चांगला माणूस होता आणि त्याने मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. मात्र त्या काळात मला आयुष्यात नेमकं काय हवं आहे, हेच कदाचित समजलं नव्हतं. मला फिरणं, पार्टी करणं आणि मोकळं आयुष्य जगणं आवडायचं ”.असं अभिनेत्रीने सांगितलं.
विभक्त झाल्याचा मुलीवर झाला परिणाम
“माझ्या मुलीसाठी हा अनुभव खूप कठीण होता, हे मला नंतर समजलं. आई ही मुलासाठी सर्वात मोठी सुरक्षितता असते आणि ती सुरक्षितता मी तिच्याकडून हिरावून घेतली."अशी खंत अभिनेत्रीने व्यक्त केली.
तनाज इराणीने पहिलं लग्न १९९२ मध्ये फरीद कुरीमशी केलं होतं. फरीद नाटकांमध्ये काम करायचे. तनाज इराणी लग्नानंतर एका वर्षात आई झाली. तिचं नाव जियान आहे. तिची मुलगी आता ३१ वर्षांची आहे. ती तिचे वडील फरीद कुरीम यांच्याबरोबर राहते.