"खूप नखरे, जेवणाबद्दल काही महित नाही, फक्त बसून.."; सासूने कार्यक्रमात केला पाणउतारा, हिना बघतच राहिली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 13:38 IST2025-08-29T13:35:32+5:302025-08-29T13:38:32+5:30
हिना खानच्या सासूचा भर कार्यक्रमात मोठा खुलासा. अभिनेत्री खुलासे ऐकून थक्कच झाली. व्हिडीओ व्हायरल

"खूप नखरे, जेवणाबद्दल काही महित नाही, फक्त बसून.."; सासूने कार्यक्रमात केला पाणउतारा, हिना बघतच राहिली
मनोरंजन विश्वात एक मजेशीर घटना घडली आहे. त्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आलंय. ही गोष्ट घडली ‘पती, पत्नी और पंगा’ या रिॲलिटी शोमध्ये. या शोमध्ये अभिनेत्री हिना खान आणि तिचा पती रॉकी जैसवाल सहभागी झाले आहेत. या शोमध्ये हिनाची सासू लता जैसवाल यांनी आपल्या सुनेबद्दल अनेक मजेशीर खुलासे केले आहेत. सासूकडून अचानक कौतुकाचे टोमणे ऐकून हिनाला चांगलंच आश्चर्य वाटलं. काय म्हणाली हिना?
सासूबाईंकडून हिनाचा ‘पर्दाफाश’, केला मजेशीर खुलासा
लवकरच ‘पती, पत्नी और पंगा’ या शोच्या एका खास भागात हिनाची सासू लता जैसवाल येणार आहेत. शोच्या प्रोमोमध्ये, लता जैसवाल हिनाबद्दल काही खुलासे करताना दिसते. त्या म्हणाल्या की, “मी घरी विविध पदार्थ बनवते. ती खाण्याच्या टेबलवर बसलेली असते. हिनाला स्वयंपाकाची किंवा मसाल्यांची अजिबात माहिती नाही, पण तरीही ती लगेच सांगते की एखाद्या पदार्थात मीठ किंवा मसाला जास्त झाला आहे. तिचे खूप नखरे आहेत. मी तिची सासू आहे पण तिच्याशी पंगा कोण घेईल??”
हिनाच्या सासूचं बोलणं ऐकून शोचा होस्ट मुनव्वर फारुकी आणि प्रेक्षक खूप हसले. हिना आणि रॉकी दोघेही त्यांच्या आईच्या या प्रामाणिकपणाने आश्चर्यचकित झाले. हिनाचा चेहरा तर बघण्यासारखा झाला होता.
हिनाचं सासूसोबत प्रेमळ नातं
ही पहिलीच वेळ आहे जेव्हा हिनाची सासू कोणत्याही टीव्ही शोमध्ये दिसल्या आहेत. लता जैसवाल यांनी हिनाबद्दल केलेले मजेशीर खुलासे ऐकून सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्यावरून त्यांच्यातील सासू-सुनेचं नातं किती प्रेमळ आणि मैत्रीचं आहे, हे दिसून आलं. टीव्हीवर अनेकदा सासू-सुनेच्या नात्यातील वाद दाखवले जातात. पण हिना आणि तिच्या सासूचे नातं याच्या अगदी उलट आहे. त्यांच्यात वाद असण्याऐवजी, एकमेकांबद्दल आदर आणि प्रेम आहे. याच आदराच्या भावनेने दोघीही एकमेकांची मस्करी करताना दिसतात