लग्नाच्या ९ वर्षानंतर आई होणार? प्रसिद्ध अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "लवकरच तुम्हाला गोड बातमी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 10:07 IST2025-10-30T10:06:17+5:302025-10-30T10:07:32+5:30
टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री वयाच्या ४० व्या वर्षी आई होणार असल्याची हिंट तिने चाहत्यांना दिली आहे. काय म्हणाली अभिनेत्री?

लग्नाच्या ९ वर्षानंतर आई होणार? प्रसिद्ध अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "लवकरच तुम्हाला गोड बातमी..."
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) आणि तिचा पती विवेक दहिया (Vivek Dahiya) यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. २०१६ मध्ये या दोघांनी एकमेकांशी लग्न केलं. आता त्यांच्या लग्नाला जवळपास नऊ वर्षे झाली आहेत. दरम्यान, एका मुलाखतीत दिव्यांकाने आई होण्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे सर्व चाहत्यांना दिव्यांका लवकरच गुड न्यूज देणार का, असा प्रश्न पडला आहे.
बाळाबद्दल बोलताना काय म्हणाली दिव्यांका?
दिव्यांका त्रिपाठीला नुकतंच गलाटा इंडियासोबत दिलेल्या एका मुलाखतीत विचारण्यात आलं की, लग्नाच्या नऊ वर्षानंतरही तिने बाळाचे नियोजन का केलं नाही? या प्रश्नावर दिव्यांकाने अत्यंत स्पष्टपणे उत्तर दिलं. अभिनेत्री म्हणाली, ती आणि विवेक दोघेही सध्या त्यांच्या कामात व्यस्त आहेत, पण आता ते बाळाचा विचार करत आहेत. दिव्यांकाने सांगितलं की, "लवकरच मी तुम्हाला गोड बातमी देईन. मी काही महिन्यानंतर कामातून थोडा ब्रेक घेणार आहे." तिच्या या विधानामुळे अभिनेत्री लवकरच आई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सुरुवातीच्या काळात करिअरवर लक्ष
लग्नाच्या सुरुवातीच्या काळात दोघांनीही आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रित केले. नऊ वर्षांच्या वैवाहिक जीवनात त्यांनी एकमेकांना पुरेसा वेळ दिला आणि आता ते पालकत्वाची जबाबदारी घेण्यासाठी तयार आहेत, असं दिव्यांका म्हणाली. सध्या दिव्याने एक शो साईन केलाय. या शोचं काम पूर्ण झाल्यावर ती बाळाचा नक्कीच विचार करणार आहे, असं तिने सांगितलं आहे. दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांच्या चाहत्यांना आता त्यांच्या 'गोड बातमी'ची आतुरता आहे. दिव्यांका सध्या ४० वर्षांची आहे. 'ये है मोहब्बते' मालिकेतून तिला चांगली लोकप्रियता मिळाली.
