घटस्फोटाच्या चर्चांवर अमन वर्माने सोडलं मौन; म्हणाला, "सध्या मी इतकंच...", पत्नीची क्रिप्टिक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 15:26 IST2025-02-27T15:26:07+5:302025-02-27T15:26:43+5:30
दोघांचा ९ वर्षांचा संसार मोडणार?

घटस्फोटाच्या चर्चांवर अमन वर्माने सोडलं मौन; म्हणाला, "सध्या मी इतकंच...", पत्नीची क्रिप्टिक पोस्ट
सिनेसृष्टीत सध्या घटस्फोटांचं प्रमाण वाढत चाललं आहे. गोविंदाचा घटस्फोट चर्चेत असतानाच अभिनेता अमन वर्मा (Aman Verma) आणि पत्नी वंदना लालवानीच्याही (Vandana Lalwani) घटस्फोटाची बातमी समोर आली. दोघांनी लग्नानंतर ९ वर्षांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाची चर्चा आहे. तर आता अभिनेता अमन वर्माने यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
५३ वर्षीय अमन वर्मा टीव्ही आणि सिनेमातील लोकप्रिय चेहरा आहे. 'बागबान' सिनेमात त्याने साकारलेली भूमिका सर्वांच्याच लक्षात आहे. तसंच तो गाजलेल्या 'क्योंकी सांस भी कभी बहू थी' मालिकेत होता. पत्नीसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "मला आताच काहीही सांगायची इच्छा नाही. मी सध्या एवढंच बोलू शकतो."
तर दुसरीकडे अमन वर्माची पत्नी वंदना लालवानीने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत लिहिले, 'सत्याचा विजय होईल."
वंदनाची पोस्ट आणि अमनच्या उत्तरानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा आणखी जोर धरुन आहेत. अमनची पत्नी वंदनाने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. दोघांच्या कुटुंबाने दोघांमधली भांडणं, तणाव मिटवण्याचा विचार केला होता. अनेक प्रयत्न करुनही दोघांमधील नातेसंबंध सुधारले नाहीत त्यामुळे दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
अमन आणि वंदना या दोघांची पहिली भेट २०१४ मध्ये 'हमने ली है शपथ' मालिकेच्या सेटवर झाली. पुढे त्यांच्यातली मैत्री वाढली आणि दोघांनी २०१६ ला लग्न करण्याचा निर्णय घेतला.