Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’च्या सेटवर रूपाली भोसलेला दुखापत, समोर आला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 10:18 AM2022-04-19T10:18:52+5:302022-04-19T10:19:16+5:30

Aai Kuthe Kay Karte : होय, मालिकेतील संजना अर्थात ही भूमिका साकारणारी अभिनेत्री रूपाली भोसले ( Rupali Bhosle ) हिला शूटींग करताना दुखापत झाली आहे.

Aai Kuthe Kay Karte actress Rupali Bhosle gets injured on the set | Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’च्या सेटवर रूपाली भोसलेला दुखापत, समोर आला फोटो

Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’च्या सेटवर रूपाली भोसलेला दुखापत, समोर आला फोटो

googlenewsNext

‘आई कुठे काय करते’  (Aai Kuthe Kay Karte ) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका. मालिका जितकी लोकप्रिय आहे, तितकेच या मालिकेतील कलाकारही लोकप्रिय आहेत. तुम्हीही या मालिकेतील कलाकारांचे फॅन्स असाल तर तुमच्यासाठी एक निराश करणारी बातमी आहे. होय, मालिकेतील संजना अर्थात ही भूमिका साकारणारी अभिनेत्री रूपाली भोसले ( Rupali Bhosle ) हिला शूटींग करताना दुखापत झाली आहे. तिने स्वत: सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत याबाबतची माहिती दिली.

रुपाली भोसलेने काही तासांपूर्वी इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तिने ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवर चित्रीकरणावेळी तिला दुखापत झाल्याची माहिती दिली आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओत तिच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाल्याचं दिसतंय. पायाच्या अंगठ्याला बँडेज पट्टी लावलेली यात दिसतेय. आजच्या शूटदरम्यान दुखापत झाल्याची माहिती तिने दिली आहे.

तिने सांगितले की, मी मिलिंद गवळीसोबत एका सीनचं शूटिंग करत होते. अनिरुद्ध हा संजनाला घटस्फोट देण्याचा विचार करत असतो. तो संजनावर ओरडतो आणि त्याचा तो रूद्रअवतार पाहून मी रडायला लागते आणि खुर्चीवर बसते, असा एक सीन होता. आमचे दिग्दर्शक रवी यांनी मला खुर्चीवर बसायला सांगितलं होतं. पण मी जमिनीवर बसावं, असं मला वाटलं. सीन अंतिम टप्प्यात असताना मी इतक्या जोरात खाली बसले की, माझ्या पायाचं बोट पूर्णपणं वळलं आणि माझं नख बाहेर आलं. काही क्षण मला काहीच जाणवलं नाही. पण नंतर  तीव्र वेदना जाणवू लागल्या.  आम्ही चित्रीकरण थांबवलं. त्यानंतर पायाला खूप गंभीर दुखापत झाल्याचं मला कळलं. सध्या मी बरी आहे. वेदना आहेत. पण त्यासाठी शूटींग थांबवणं शक्य नाही, असंही ती म्हणाली.

Web Title: Aai Kuthe Kay Karte actress Rupali Bhosle gets injured on the set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.