'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत नवा ट्विस्ट, AJ लीलाला घालणार लग्नाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 12:54 PM2024-03-30T12:54:09+5:302024-03-30T12:54:44+5:30

Navari Mile Hitlerla : 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेला अगदी पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. या मालिकेतील AJ आणि लीलाची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे. दरम्यान आता मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे.

A new twist in the 'Navari Mile Hitlerla' series, AJ will propose marriage to Leela | 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत नवा ट्विस्ट, AJ लीलाला घालणार लग्नाची मागणी

'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत नवा ट्विस्ट, AJ लीलाला घालणार लग्नाची मागणी

झी मराठी वाहिनीवरील 'नवरी मिळे हिटलरला' (Navari Mile Hitlerla) या मालिकेला अगदी पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. या मालिकेतील AJ आणि लीलाची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे. दरम्यान आता मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. एजेच्या आईला लीला पसंत पडली असून तो तिला लग्नाची मागणी घालताना दिसणार आहे आणि लीला काय उत्तर देणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत सीता रूपात लीला AJच्या घरी आली आहे आणि त्याचवेळेस विश्वरूपने लीलाचा अपमान करण्यासाठी मिडीयाच्या लोकांना घरी बोलवून ठेवलं आहे. दुर्गा लीलाच्या बाबांचा अपमान करते की तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय तेव्हा लीला सांगते की मी लग्नासाठी नाही तर ऑडीशनला आले होते आणि या अंकल सोबत लग्न करायला कोण तयार होणार? 

इकडे एजेच्या आईला मात्र लीला पसंत पडलीय. ती एजेला सांगते की लीलामध्ये तिला अंतरा दिसते. तर दुसरीकडे लीलाला धडा शिकवायचा म्हणून लक्ष्मी तिचा फोटो पेपरमध्ये छापते आणि तिचा बदनामी करण्याचा प्रयत्न करते. एजे लीलाच्या आई वडीलांची माफी मागायला घरी जातो. आणि त्याचवेळेस तो लीलाला लग्नाची ऑफर देतो. आता AJ च्या लग्नाच्या मागणीला, काय असेल लीलाच उत्तर? यासाठी 'नवरी मिळे हिटलरला' मालिका पाहावी लागेल.

Web Title: A new twist in the 'Navari Mile Hitlerla' series, AJ will propose marriage to Leela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.