सुशांत-आलिया एकत्र
By Admin | Updated: December 3, 2014 01:56 IST2014-12-03T01:56:05+5:302014-12-03T01:56:05+5:30
आलिया भट्ट आणि सुशांत सिंह राजपूत यांची जोडी लवकरच मोठ्या पडद्यावर दिसण्याची शक्यता आहे

सुशांत-आलिया एकत्र
आलिया भट्ट आणि सुशांत सिंह राजपूत यांची जोडी लवकरच मोठ्या पडद्यावर दिसण्याची शक्यता आहे. फाईंडिंग फेनी या चित्रपटाचा दिग्दर्शक होमी अडजानियाने आलिया आणि सुशांतला त्याच्या आगामी चित्रपटासाठी साईन केल्याचे कळते. दोन दशकांवर आधारित प्रेम कथा या चित्रपटात दाखवली जाणार आहे. सुशांत सध्या दिबाकर बॅनर्जी यांच्या ब्योमकेश बक्शी या चित्रपटाचे शूटिंग करीत असून, आलियाने शानदारचे शूटिंग संपवले आहे. दोघेही नव्या पिढीतील प्रतिभावंत कलाकार आहेत. दोघांनाही त्यांच्या अभिनयासाठी प्रशंसा मिळाली आहे. त्यामुळे हे दोन प्रतिभावंत कलाकार एकत्र आले, तर प्रेक्षकांनाही नक्कीच काही नवे पाहायले मिळेल, अशी अशा आहे.